नांदेड शहरात मनपाकडून निर्जंतुकीकरण फवारणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 12 May 2021

नांदेड शहरात मनपाकडून निर्जंतुकीकरण फवारणी

नांदेड दि 12  : मागील वर्षापासून कोरोनाने देशभरासह नांदेडात चांगलेच थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बुधवारी रविनगर परिसरासह शहरातील विविध भागात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. 


कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. गत पाच, सहा दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर मृत्यूदरही कमी झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. 


दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डाॅ. बिसेन व जीवशास्त्रज्ञ डाॅ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक एस. पी. पाशमवाड, वरिष्ठ क्षेत्रकर्ता गणेश भुसा व इतर पुरुष मजूरांनी शहरातील श्रीनगर व रविनगर परिसरासह अन्य परिसरात ठिक-ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Pages