कार्यकर्ता सक्षम तर, चळवळ परिपक्वः चंद्रकांत जगताप ; चार दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा उत्साहात संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 8 May 2021

कार्यकर्ता सक्षम तर, चळवळ परिपक्वः चंद्रकांत जगताप ; चार दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा उत्साहात संपन्न

सातारा: ( प्रतिनिधी ) आंबेडकररी चळवळीतील कार्यकर्ता हा सक्षम असायला हवा. किंबहुना त्याने स्वतःसह सभोवतालच्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे करताना नैतिकता आणि सदाचरणाच्या भक्कम पायावर त्याने वाटचाल केली पाहिजे तरच ख-या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील चळवळ सक्षमपणे पुढे जाईल असे महत्वपूर्ण विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी व्यक्त केले. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज रिसोर्स सेंटर व सामुदायिक विकास व संसाधन व्यवस्थापन संस्था यांच्या विद्यमाने क्रांतीसूर्य जोतिराव फुले व प्रज्ञासूर्य  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित  चार दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून चंद्रकांत जगताप बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून छ. शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर उपस्थित होते, तर संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, समता सैनिक दलाचे प्रमुख अरुणभाऊ पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.


चंद्रकांत जगताप पुढे म्हणाले की कार्यकर्ता, नेता घडविण्यासाठी आज सुत्रबध्दपणे आपल्याला काम करावे लागेल. त्यासाठी सामाजिक, राजकीय, धार्मिक आर्थिक अशा सर्व पातळ्यावरील चिकित्सक वृत्तीने मागोवा घेऊन कार्यकर्त्याचा वैचारिक पाया भक्कम करून आपल्याला पाऊले टाकावी लागतील. जर यापध्दतीने एकूण वाटचाल झाली तर अपेक्षित यश आपल्या हाती लागल्याशिवाय राहणार नाही. यश मिळवणे अवघड नाही परंतु त्यासाठी व्यव्हरचना महत्त्वाची आहे, असेही जगताप यांनी स्पष्ट केले. 


समारोपाच्या सत्राचे पुष्प जागतिक धम्म चळवळीचे अभ्यासक धम्मचारी मैत्रेयनाथ यांनी गुंफले. ते म्हणाले कार्यकर्त्यांच्या जीवनात सदाचारणाचे महत्त्व हे अनन्यसाधारण असे आहे. सदाचाराच्या आचारणामुळे माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण होत असतो. दरम्यान उदघाटन सत्रात सुनील कदम यांनी आंबेडकरी चळवळीचा इतिहास आणि युवकांची जबाबदारी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे उद्घाटन नारायण जावलीकर यांच्या हस्ते पार पडले. या कार्यशाळेत रिपब्लिकन युवा मोर्चाचे संस्थापक राहुल डंबाळे यांनी आंबेडकरी चळवळीचे भविष्य यासंबधी महत्वपूर्ण मांडणी केली. धम्मचारी संघादित्य, ऍड. हौसेराव धुमाळ यांनी विविध सत्रातून अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेत संपूर्ण महाराष्ट्रातुन असंख्य स्त्री पुरुष व युवा कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला,


या कार्याशाळेपूर्वी क्रांतिसिह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालय, समता सैनिक दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज रिसोर्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले.

दोन्ही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रसाद गुडीले, प्रज्वल मोरे, शिवाजी गंगावणे, प्रकाश गडांकुश, विजय भंडारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages