कॅनडाच्या बौद्ध भिक्खुंची भारताकरता दान पारमिता ! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 10 May 2021

कॅनडाच्या बौद्ध भिक्खुंची भारताकरता दान पारमिता !

मुंबई - 

कॅनडातील स्थित "द अर्बन बुद्धिस्ट मॉंक" ह्या संस्थेचे संस्थापक भन्ते शरणपाल यांनी भारतातील कोविड परिस्थिती सुधारण्यासाठी दान करण्याचे ठरविले आहे. या सत्कार्यासाठी त्यांनी कॅनडा येथील त्यांच्या विद्यार्थी व उपासकांकडून दानासाठी आवाहन  केले. त्यातूनच भारतातील काही भिक्खुंना काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या दानातून अन्नधान्य, औषधं आणि ॲाक्सिजन यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

उत्तर भारतात डॉ राहूल कुमार बल्ली व भन्ते सुमित रत्न थेर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्कार्य चालू असून दक्षिण भारतात महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठाच्या पालि विभागावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसारच दिल्ली येथे भन्ते शरणपाल यांच्या वतीने भन्ते सुमितरतन थेर व सारनाथ येथे भन्ते चन्दिमा यांच्या तर्फे काही रक्कम आवश्यक गरजूंना देण्यात आली व मुंबई विद्यापीठाच्या पालि विभागाच्या तर्फे काही रक्कम ही नागपूर,नागलोक येथील "द बुद्ध मल्टि स्पेशालिटी चॅरिटी क्लिनिक" ,ला सुपूर्द करण्यात आली. तसेच घरोघरी असलेल्या कोरोना रूग्णांना अॉक्सिजन पुरवणाऱ्या राजिव खोब्रागडे यांना सुद्धा काही रक्कम सोपवण्यात आली.

भन्ते शरणपाल यांच्या विषयी सांगायचे झाले तर ते कॅनडा येथील "द अर्बन मॉंक" ह्या संस्थेचे संस्थापक आहेत तसेच धम्मावर त्यांनी पी.एच.डी प्राप्त केली आहे. ते सार्वजनिक वक्ते, मन प्रशिक्षक  व मेडिएशन ॲंड स्पिरीच्युअल काऊन्सल्सर ॲाफ कॅनडा या संस्थेचे संस्थापक आहेत. कॅनडा सरकारकडून त्यांना कॅनडातील मानाचे १५० पदक व सेस्क्वेसिंटेनिअल कम्युनिटी अवॉर्ड दिले गेले आहेत. तसेच त्यांनी मिसिसॉगा, ब्रॅम्प्टन, टोरोंटो, पील प्रदेश आणि टोरोंटो डिस्ट्रिक्ट स्कूल येथे साधना शिबीरे घेतली आहेत. 



No comments:

Post a Comment

Pages