हिंद महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात एकाचवेळी चक्रीवादळ हालचाली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 11 May 2021

हिंद महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात एकाचवेळी चक्रीवादळ हालचाली

पुणे :-  यंदा तब्बल दहा दिवस आधीच मान्सूनला गती देणार्‍या चक्रीवादळाची निर्मिती हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकाचवेळी सुरू झाली आहे. पुढील १२०  तासांत म्हणजे सहा दिवसांत ते ओमानकडे सरकणार आहे. हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या हंगामातले पहिले सायक्लोन बुलेटिन सोमवारी प्रसिद्ध केले.

         यंदा मान्सून लवकरच येणार असल्याची ही वर्दी असून, दरवर्षी २०  मेच्या सुमारास बंगालच्या उपसागरात अशी तयारी पाहावयास मिळते; मात्र यंदा दहा दिवस आधीच हिंद महासागरातील मालदीव बेटाजवळ, तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार होण्यास सुरुवात झाली आहे. हवामानशास्त्राच्या भाषेत याचे वर्णन सायक्लोजेनेसिस असे केले आहे. सायक्लोजेनेसिस म्हणजे चक्रीय परिस्थिती. सोमवारी दुपारी ही स्थिती या तिन्ही ठिकाणी निर्माण झाली असून, वार्‍याचा वेगही वाढला आहे. 

       भारतीय हवामानशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांच्या मते, १० मे रोजी दुपारी ही सुरुवात झाली आहे. सध्या वार्‍यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, पुढील १२० तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. पहिल्या टप्प्यात १४  मेपर्यंत चक्रीय स्थितीचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात व १६ मे रोजी चक्रीवादळ तयार होऊन ते ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. हीच स्थिती श्रीलंकेच्या किनारपट्टीवरदेखील आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, ही स्थिती मान्सूनसाठी पूरक असून, त्याला गती देणारी आहे. त्यामुळे यंदा मान्सून २०  मेपर्यंत बंगालच्या उपसागरात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment

Pages