मोफत शिक्षण कायद्याच्या अंतर्गत इयत्ता आठवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी व 10 वि मध्ये मोफत प्रवेश मिळावा अशी मागणी सुरेश हाटकर यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडे केली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 16 June 2021

मोफत शिक्षण कायद्याच्या अंतर्गत इयत्ता आठवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी व 10 वि मध्ये मोफत प्रवेश मिळावा अशी मागणी सुरेश हाटकर यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडे केली

नांदेड   :   मोफत शिक्षणाचा कायद्यांतर्गत ज्या विद्यार्थ्यांनि इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. अशा विद्यार्थ्यांना पुढील नववी व दहावीच्या वर्गात मोफत प्रवेश द्यावा आणि आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कोंडी थांबवावी अशी मागणी. नांदेड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हाटकर यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अशोकराव चव्हाण यांच्या  कडे एका निवेदनाद्वारे केली.

 पुढे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की ' बालकांचा मोफत  व सक्तीचा शिक्षण कायदा 2009 '  प्राथमिक शिक्षण संचनलयाद्वारे राज्यातील स्वयं अर्थ सहाय्यीत नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 25 टक्के जाग्यावर आर टी ई अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलां - मुलींना पहिली ली ते आठवी पर्यंत चे शिक्षण मोफत दिल्या जाते. परंतु राज्यभरात ज्या ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत स्वयं अर्थ साहाय्यीत शाळा मध्ये सणब 2011 साली प्रवेश घेतला होता. आर.टी.ई. कायद्याने त्यांच्या शिक्षणाचा मोफत अधिकार संपुष्टात आला आहे. जो विद्यार्थी आठवी इयत्ता उत्तीर्ण होऊन नववी व दहावीमध्ये आलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरावी लागणार आहे. संबंधित शाळा व प्रशासन कायद्याकडे 'बोट दाखवून' आर. टी. ई. कायदा संपला आहे असे म्हणत आहेत. सदरील शाळांची फिस व फिसची रक्कम खूप मोठी असून ती आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील वर्गातील लोकांना न परवडणारी आहे. व सर्व सामान्य गरीब माणसाच्या कुवती बाहेर आहे. या गोष्टी ची चिंता सर्व पालक वर्गात खूप मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. आधीच मागील दोन वर्षांपासून कोरोना सारख्या महामारीच्या काळात सर्व सामान्य माणूस हा खूप मोठया प्रमाणात हेरपळला आहे. व हाताला काम नसल्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहा चा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा अतिशय भयंकर परिस्थितीत आपल्या मुलां - मुलींना शिक्षण कसे दयावे हा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. इकडे आड व तिकडे विहीर अशी गंभीर समस्या पुढे उभी टाकली  आहे. प्राथमिक शिक्षणातुन माध्यमिक शिक्षणाच्या दारावरच हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. ज्या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली आहे. तिचा मूळ उद्देश हा साध्य होताना आज घडीला दिसत नाही. हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. अशा या विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कावर गदा येत आहे. सदरील प्रकरणात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष लक्ष देऊन याचा शासन स्तरावर पाठपुरावा करून या हजारो गोर गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती सुरेश हाटकर यांनी नम्र निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हे निवेदन स्वीकारून राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा. ना. वर्षा गायकवाड यांच्या कडे पाठवून याचा शासन स्तरावर पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. या निवेदनावर नांदेड मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती सौ. गीतांजली किशोर हाटकर, नांदेड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश हाटकर व सामाजिक कार्यकर्ते कोंडदेव हाटकर यांची स्वाक्षरी आहे.

No comments:

Post a Comment

Pages