उस्मानाबाद : वाशी तालुक्यातील झिन्नर गावात विकास कामे जोरात सुरू असल्याच्या द्वेषातून बौध्द सरपंच शिल्पा राजेंद्र गरड व कुटुंबियांवर जातीय सूडभावनेने हल्ला करणा-या 9 पैकी 4 आरोपींना आज वाशी पोलीसांनी अटक केली आहे.
14 जून रोजी रात्री आरोपींनी भीषण हल्ला करून सरपंच शिल्पा राजेंद्र गरड यांच्यासह गरड कुटुंबियांवर केलेल्या भीषण हल्ल्यात 6 जण गंभीर जखमी झाले होते.
भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव व माजी महाराष्ट्र अध्यक्ष अशोकभाऊ कांबळे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनीलभाऊ गायकवाड मुख्य महासचिव सीतारामजी गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कार्याध्यक्ष इंजिनियर अविनाश गरूड व वरीष्ठ उपाध्यक्ष अविनाश समींदर तसेच उस्मानाबाद जिल्हा प्रमुख अविनाश गायकवाड, रवी कदम,जिल्ह्यातील तालुका प्रमुख, कार्यकर्ते यांनी आज झिन्नर गावात जाऊन पिडीत गरड परिवाराची भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेनंतर पोलीसांनी आरोपींना दोन तासात अटक न केल्यास भीम आर्मी आपल्या स्टाईलने आरोपींना पकडून आणतील असा संतप्त ईशारा उस्मानाबाद पोलीस अधीक्षक व उप अधीक्षक यांना दिल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली व दोन तासाच्या आतच पोलीसांनी 4 आरोपींना अटक केली .
दरम्यान आणखी 5 आरोपींना अटक करून 9 आरोपींविरुध्द कडक कारवाई करावी तसेच गरड कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने वरीष्ठ पोलीस अधिका-यांकडे करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment