फक्त १६३ दिवसात २०० किसान रेल्वे नगरसूल येथून देशभरात रवाना , शेतकऱ्यांना लाभ ; माल वाहतूक दरात ५० % सूट, इतर स्थानकावरून सुद्धा शेतकरी आणि शेतीमाल व्यापारी यांना संधी चा लाभ घेण्याचे विभागीय व्यवस्थापकांचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 16 June 2021

फक्त १६३ दिवसात २०० किसान रेल्वे नगरसूल येथून देशभरात रवाना , शेतकऱ्यांना लाभ ; माल वाहतूक दरात ५० % सूट, इतर स्थानकावरून सुद्धा शेतकरी आणि शेतीमाल व्यापारी यांना संधी चा लाभ घेण्याचे विभागीय व्यवस्थापकांचे आवाहन

नांदेड    :  दिनांक  १६ जून, २०२१ रोजी नांदेड रेल्वे विभागातील नगरसूल येथून २०० वी किसान रेल्वे  २४६ टन कांदा घेवून पश्चिम बंगाल येथील मालडा टाऊन येथे रवाना झाली. नांदेड रेल्वे विभागातून या वर्षी दिनांक ०५ जानेवारी, २०२१  रोजी सुरु केलेल्या किसान रेल्वे ने मोठा पल्ला गाठला आहे. फक्त १६३  दिवसात २००  किसान रेल्वे ने नगरसूल येथून देशाच्या विविध भागात कांदा, द्राक्षे आणि टरबूज पोहोचविले आहे.  यातून नांदेड रेल्वे विभागास २८.३५  कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. किसान रेल्वे ने वाहतूक केल्यामुळे वाहतूक दरात ५०  % सूट देण्यात येत आहे. अनेक शेतकरी/ व्यापारी याचा लाभ घेत आहेत. फक्त १६३ दिवसात २०० किसान रेल्वे चालविल्याबद्दल श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक , नांदेड यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.


या २०० किसान रेल्वे मधून आज पर्यंत ६१७४७ टन कांदा, टरबूज आणि द्राक्षांची वाहतूक झाली आहे. हा शेतीमाल देशातील विविध भागात जसे न्यू  गुवाहाटी, नावगाचिया, डानकुनी,  मालडा टाऊन, गौर माल्दा,  अगरतला, फातुहा, न्यू जलपैगुडी इत्यादी ठिकाणी पोहोचविण्यात आला आहे. यामुळे कांदा, टरबूज आणि द्राक्षे उत्पन्न करणारे शेतकरी किसान रेल्वे चा लाभ घेत येत आहेत.  नांदेड रेल्वे विभागातील इतर ठिकाणाहून सुद्धा किसान रेल्वे सुरु करण्याकरिता संबधित बी.डी.यु. टीम मधील अधिकारी प्रयत्नरत आहेत. मालवाहतूक भाड्यात ५० % सूट चा इतर ठिकाणातील शेतकरी मित्रांनी / व्यापार्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी केले आहे.


कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. किसान रेल्वे चे वैशिठ्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात, साधारण ५०  किलोमीटर प्रती घंटा या वेगाने धावतात, यामुळे शेती माल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजार पेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना  आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने "ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल" च्या अंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० % वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली.  त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वे ला वाहतुकीसाठी ५० % दर सवलत देण्यात आली आहे.


        नांदेड रेल्वे विभागातून मालवाहतूक वाढावी म्हणून श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी बिजनेस डेवलोपमेन्ट युनिट (बी.डी.यु.) ची टीम गठीत केली आहे. या टीम मध्ये चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेलीय. हे अधिकारी नांदेड रेल्वे विभागातील विविध ठिकाणी भेटी देवून मालवाहतूक वाढवण्याकरिता सतत प्रयत्न करत आहेत. यामध्ये श्री जय पाटील/ वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, श्री ए.  श्रीधर/ वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, श्री उदयनाथ कोटला/ वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक,  श्री शेख मोहम्मद अनिस/ वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता, नांदेड  यांचा समावेश आहे. तसेच मालवाहतूकदार आणि व्यावसायिकांशी सतत संपर्कात राहण्या करिता डॉ. अनिरुद्ध पमार/विभागीय परिचाल व्यवस्थापक आणि श्री व्ही. रविकांत/सहायक वाणिज्य व्यवस्थापक  यांची  नियुक्ती केली आहे.

         


No comments:

Post a Comment

Pages