सिटीबस पर्यावरण संरक्षणाचा खरा मार्ग : सिटी बसेस बाबत राज्यभरातील पर्यावरण संस्था राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 9 June 2021

सिटीबस पर्यावरण संरक्षणाचा खरा मार्ग : सिटी बसेस बाबत राज्यभरातील पर्यावरण संस्था राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार

 


प्रतिनिधी 

आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त अनेक उपक्रम दरवर्षी साजरे होतात जैसे की झाडे लावणे, प्लॅस्टिक सफाई मोहीम, सायकल रॅली मात्र परिवहनमुळे शहराच्या पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व सार्वजनिक वाहतूक या संकटावर उपाय कसा असू शकते या मुद्याला समोर ठेवत सम नेट च्या “लाख को पचास” या मोहीमेअंतर्गत परिसर द्वारे राज्यस्तरीय ऑनलाईन चर्चेचे आयोजन करण्यात आले. यात २० पेक्षा अधिक संस्था व शेकडो पर्यावरण कार्यकर्त्यांनी ऑनलाईन झूमच्या माध्यमातून हजेरी लावली. 

अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक, अकोला मध्ये काम करीत असलेल्या पर्यावरणवादी संस्था या चर्चेत सहभागी झाल्या. सुरवातीला परिसरच्या स्वाती पाठक यांनी PPT द्वारे झपाट्याने वाढणारी खाजगी वाहने आणि त्यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा (फ्लायओव्हर/कॉंक्रिटचे रस्ते /बहुमजली पार्किंग ई ) हे शहराच्या पर्यावर्णाला कसे घातक ठरतात आणि नॉन मोटराइज्ड परिवहन (चालणे व सायकली) व सार्वजनिक वाहतूक (सिटीबसेस) कशा पद्धतीने झाडे, पाणी, हवा, जैवविविधता आणि जमिनीचे संरक्षण करू शकतात हे समजाविले. जगभरात शहरात सिटी बसेसची संख्या एक लाख लोकांसाठी ८०-९० असते परंतु महाराष्ट्रात ती ८-१० एवढीच आहे त्याचा आपल्याला व आपल्या पर्यावरणाला कसा धोका होतोय हे त्यांनी समजाविले. महाराष्ट्रात एकूण तीन कोटी खाजगी वाहने आहेत तर फक्त 6,500 सिटीबसेस आहेत तेव्हा मोठ्या प्रमाणात वाहनान मधून निघणार धूर व कार्बन डायऑक्साईड आणि वाहनांसाठी बनविल्या जाणारे मोठ मोठाले रास्ते, उड्डाणपूल इत्यादि आणि त्यामुळे होणारे शहराचे पर्यावरणीय नुकसान या वरती सखोल चर्चा करण्यात आली. चर्चासत्रात सिटी बसेस व पर्यावरणाला आधारित काही प्रमुख मुद्दे उपस्थित केले गेले. अमरावती येथून NEERI तर्फे यशराज इंगोले यांनी खाजगी वाहनांची मालकी व त्यामागील मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे तेव्हाच लोक सार्वजनिक वाहतुकी कडे वळतील असे सांगितले. प्रा. रश्मी माने,  युगंधर फाउंडेशन सोलापूर यांनी बससेची वारंवारिता वाढणे गरजेचे आहेत त्यामुळे लोक सार्वजनिक वाहतुकी कडे वळतील असे मत व्यक्त केले. अर्बन रिसर्च फाऊंडेशन चे श्रीनिवास देशमुख यांनी लोकांना जर सार्वजनिक वाहतुकीकडे वळवायचे असेल तर सिटी बसेसला “ब्रांड” बनविणे गरजेचे आहे. ज्यामुळे सर्वच स्तरावरील लोकांना सार्वजनिक वाहतुकीकडे येण्यास प्रवृत करता येईल. अरण्यम अमरावतीचे सर्वेश मराठे यांनी रस्ते, उड्डाणपूल बांधल्याने ट्राफिक कमी होणार नाही त्यासाठी शासकीय संस्थांना निधी तसेच संशोधक व नवीन तंत्रज्ञानाच्या मार्गावर आपण शाश्वत विकासाकडे मार्गक्रमण करू शकतो असे मत व्यक्त केले.  भारत छेडा यांनी PPP मॉडेल द्वारे सिटीबससेला इलेक्ट्रॉनिक, सोलर पद्धतीने स्वस्त अथवा मोफत करू शकतो, ज्यामुळे लोक बसेसचा वापर करतील व त्यामुळे इंधन बचत व पर्यावरण संरक्षण होईल असे सांगितले. सर्व सहभागी संस्था यांनी सिटी बसेस ह्या पर्यावरण संरक्षणाचा उत्तम मार्ग असू शकतात व त्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मेट्रो सारख्या प्रकल्पांवर हजारो कोटी खर्च केल्यापेक्षा सिटीबसेस वर काही खर्च केला तर आपण शाश्वत विकासाकडे जगाला नेऊ शकतो असे मत व्यक्त केले. 

परिसर चे राज्य समन्वयक विकास तातड यांनी सांगितले की,  येत्या काळात सर्व संस्था मिळून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सिटीबसेसच्या संख्या वाढाव्यात या करिता पाठपुरावा देखील करणार आहेत

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास तातड यांनी केले असून स्वाती पाठक यांनी सार्वजनिक वाहतूक व पर्यावरण यांचा संबंध या विषयी मार्गदर्शन केले तसेच परिसर संस्था संस्थापक सुजित पटवर्धन, रणजित गाडगीळ,  तसेच अन्य सदस्य व परिसर शहर प्रतिनिधी उपस्थित होते.

सदर चर्चासत्र आपण या लिंक वरती https://fb.watch/5Zq3GqAh4Q/ किंवा  परिसराच्या फेसबुक पेज ला जाऊन बघू शकता. 


“लाख को 50” मोहिमेची स्थापना सस्टेनेबल अर्बन मोबिलिटी नेटवर्क (सम नेट) - व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि नागरी संस्था तसेच सर्व देशभरातील शाश्वत शहरी वाहतुकीच्या उपायांना चालना देणारी चळवळ - यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Pages