नागपूर जिल्ह्यातील सर्वच अभ्यासिका (लायब्ररी) तात्काळ सुरू करा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 9 June 2021

नागपूर जिल्ह्यातील सर्वच अभ्यासिका (लायब्ररी) तात्काळ सुरू करा

नागपुर :

कोव्हीड-19 (कोरोना) महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने टाळेबंदीची घोषणा केली होती.. त्यामुळे मागील 3 महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच अभ्यासिका बंद करण्यात आल्या.. 


दरम्यानच्या काळात  राज्यसरकारने पदभरतीच्या घोषणा केल्या व त्यानुसार बऱ्याच विभागाच्या पदभरती प्रक्रिये करिता अर्ज मागविण्यात आले.. टाळेबंदीमुळे जिल्ह्याच्या सर्व अभ्यासिका बंद असल्याकारणे विद्यार्थ्यांना बऱ्याच गैरसोयीनचा सामना करावा लागला.. 


कोविड-19 (कोरोना) चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य शासनाने सोमवार दिनांक 7 जून 2021 ला टाळेबंदीत शिथिलता दिली.. जवळपास सर्वच सरकारी आणि खाजगी संस्थाने 5 वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले..


परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता तसेच त्यांचे भविष्यात होणारे नुकसान लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ सर्वच अभ्यासिका सुरू करण्याचे आदेश देण्यासंदर्भात मानव अधिकार संरक्षण मंचचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले..


निवेदन देताना आशिष फुलझेले, अनुराग ढोलेकर, निलेश भिवगडे, सुमित कांबळे, अलोक गजभिये, भूषण वाघमारे, नीरज रंगारी, अल्पेश चवरे आणि इतर उपस्थित होते..


No comments:

Post a Comment

Pages