भारत व थायलंड च्या मैत्री प्रेमाचा दुआ : डॉ. हर्षदीप कांबळे साहेब व त्यांच्या पत्नी थायलंड च्या उद्योजिका रोजाना व्हॅनीच कांबळे मॅडम -प्रा. रविंद्र इंगळे, अमरावती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 3 June 2021

भारत व थायलंड च्या मैत्री प्रेमाचा दुआ : डॉ. हर्षदीप कांबळे साहेब व त्यांच्या पत्नी थायलंड च्या उद्योजिका रोजाना व्हॅनीच कांबळे मॅडम -प्रा. रविंद्र इंगळे, अमरावती

मित्रहो, बौद्ध धम्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, मैत्री, प्रज्ञा, शील, करुणा, मानवी मूल्य, विज्ञान वाद, मानवी मूल्यांचा पुरस्कर्ता आहे. भगवान बुद्धाच्या धम्मात मैत्री या संकल्पनेला खूप मोठे महत्व आहे. मानवी समाजात मानवी कल्याणासाठी परस्परांमध्ये मैत्री भाव असणे फारच गरजेचे आहे तरच आपण एकमेकांच्या सुख 

दुःखात समरस होऊ. सर्वांप्रती मैत्री भाव माणसाला शुद्ध बनवतो. 


नुकतेच कांबळे दाम्पत्याने कोविड परिस्थिती मधे केलेली  मदत हि  ह्या मैत्री  भावनेतूनच आणि धम्माच्या दान परिमेतून  आली आहे. डॉ.  बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारन्यामध्ये खूप सारे उद्दिष्ट होते. मात्र त्यापैकी एक उदात्त हेतू म्हणजे जगातील बौद्ध राष्ट्र भारताच्या मदतीसाठी पुढे यावेत. जगात जवळपास 100 राष्ट्र बौद्ध तत्वज्ञान मानणारे आहेत. त्यात थायलंड चा अग्रक्रम आहे. बुद्धभूमी म्हणून भारताकडे सर्व जग आदराने व श्रद्धेने पाहते.  बाबासाहेबांनी म्हटले होते कि संकट काळी बुद्धिष्ट राष्ट्रे भारताला मदत करतील. पण त्याची खरी सुरुवात करोना च्या महामारी मधे डॉ. हर्षदीप कांबळे साहेब व रोजाना व्हॅनीच कांबळे मॅडम ह्यांनी केली. मुळात डॉ. हर्षदीप साहेब व रोजाना मॅडम ह्यांना जोडणारा दुआ म्हणजेच बौद्ध धम्माचे तत्वज्ञान. मैत्री प्रेमा चे रूपांतर लग्नात झाले. ज्याची ख्याती आंतरराष्ट्रीय प्रेमविवाह म्हणून केली जाते.जो विवाह भारत व थायलंड मैत्रीचा एक नवा अध्याय ठरत आहे . कांबळे दाम्पत्य जणू काही दोन्ही देशांना जोडणारा सेतू च ठरला. 

 

  कांबळे साहेबांच्या व त्यांच्या पत्नी थायलंड च्या प्रसिद्ध उद्योजिका महाउपासिका रोजाना व्हॅनीच कांबळे ह्यांच्या पुढाकाराने थायलंड च्या बौद्ध उपासक व उपासिका ह्यांच्या दानातून भारतास 200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 25 ऍम्ब्युलन्स मिळाले आहेत. 


 काल 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नागपूर ला आदरणीय भिक्खू संघ व  राज्याचे ऊर्जामंत्री श्री. नितीन राऊत ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


साहेब, आपण ह्या करोना च्या काळात झालेले मृत्यू तांडव पाहून  व्यथित झाले. परंतु संविधानामुळे मोठ मोठ्या नोकरी वर असणारे अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक जर एकत्रित समोर आले तर  खुप चांगली  मदत  जनतेला ह्या  कठीण काळात  होऊ  शकते.  हाच  मुद्दा आपण  मांडला  आहे. बाहेरच्या बुद्धिस्ट  देशातील  लोकांनी भारताला मदत  करीत  आहेत  त्यामुळे  आपणही  मागे न  राहता एकत्रित पणे  पुढे  येऊन दान पारमितेच  पालन  केले पाहिजे ह्या तुमच्या  मताशी आम्ही सहमत आहोत. ह्या  निमित्ताने तुम्ही इतर बुद्धिस्ट  देश्याना  भारतासोबत , जी  बुद्ध भूमी आहे , तिला  जोडण्याचं  खूप महत्व पूर्ण  काम करीत  आहात म्हणजेच  बाबासाहेबांच्या  विचारावरच चालत आहात असं  दिसते. तुमच्या धम्म  कार्याला  दान पारमितेला महाराष्ट्रातील  लोक  आदर्श मानतात. .असेच तुम्ही आमची प्रेरणा बनून राहावे हि सदिच्छा.आपल्या पुढच्या कार्यास कोटी कोटी शुभेच्छा !

   

-प्रा. रविंद्र इंगळे, अमरावती

No comments:

Post a Comment

Pages