नांदेड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. धनंजय मुंडे हे दि.26 जून 2021 रोजी नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांना नसोसवायएफ च्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम त्वरित विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात आले.
शै.वर्ष 2019-20 च्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची पूर्ण रक्कम जमा झालेली नाही.
भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार योजना या दोन शिष्यवृत्यांच्या माध्यमातून राज्याने अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना संविधानाच्या धोरणा नुसार शैक्षणिक संवर्धनसाठी आश्वस्त केले होते पण 2019-20 शैक्षणिक वर्ष संपल्या नंतर ही शिष्यवृत्ती ची रक्कम अद्याप पर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही.यातून राज्य सरकारची भूमिका ही मागासवर्गीय शैक्षणिक धोरणा विरोधात दिसून येत आहे.
तसेच नविन शै.वर्ष 2020-21 चालू झालेले आहे .या शैक्षणिक वर्षात कोरोना सारख्या महामारीमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे हातावर पोट होते अश्या विद्यार्थ्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे.आणि स्वाधार योजनेची रक्कम जमा झालेली नसल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक कारणा मुळे कोणी शिक्षणासाठी रहायला रूम पण किरायाने द्यायला तयार नाहीत
भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम ही येत्या 15 जुलै 2021 पर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यापासून सहकार्य करावे अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाचा अवलंब करून सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण कार्यालय नांदेड आंदोलन करावे लागेल.व याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासन व समाज कल्याण विभागाची राहिल असे निवेदनात म्हटले आहे.व तसेच निवेदनाची एक प्रत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय,नांदेड यांना देण्यात आली आहे.
निवेदनावर धम्मा वाढवे(जिल्हाध्यक्ष),प्रकाश दिपके,अक्षय कांबळे,शुभम दिग्रसकर,मनोहर सोनकांबळे आदि च्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment