बौद्धांच्या स्वतंत्र निर्वाणभूमी करीता अमरावती जिल्हाधिकार्या कडे पब्लिक पार्लमेंट ची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 30 June 2021

बौद्धांच्या स्वतंत्र निर्वाणभूमी करीता अमरावती जिल्हाधिकार्या कडे पब्लिक पार्लमेंट ची मागणी


अमरावती दि. 30: 

       अमरावती जिल्हाधिकारी यांच्या कडे आज दि. 30 जून बुधवार रोजी अँड. सिद्धार्थ गायकवाड संयोजक पब्लिक पार्लमेंट यांच्या नेत्रूत्वात निवेदन देण्यात येवून बौद्धांना त्यांच्या धार्मिक रीतिरिवाजा प्रमाणे अंतिम संस्कार करण्याकरीता स्वतंत्र निर्माण भूमी देण्याची मागणी करण्यात आली.

      निवेदनात मागणी करण्यात आली की डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने आमच्या पूर्वजांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तेव्हापासून बौद्धांच्या धार्मिक प्रथा, परंपरा वेगळ्या आहेत त्यामुळे बौद्धांचा अंतिम संस्कार करण्याची सुद्धा वेगळी परंपरा आहे. त्यामुळे बौध्द परंपरेनुसार बौद्धांचा अंतिम संस्कार व्हावा त्याकरिता बौद्ध स्मशान भूमीची गरज बौद्ध समाजाला आहे.

     गेल्या जवळपास 20 वर्षापूर्वी कल्याण नगर- छाबडा प्लॉट येथे बौद्धांनी स्वतंत्र स्मशानभूमी होती परंतु शहर शुशोभीकरनाच्या नावावर तिथे बगीच्या बनविण्यात आला त्या मोबदल्यात दुसरे कोणतेही स्मशान बौद्धांना देण्यात आले नाही. त्यामुळे फ्रेजरपूरा येथील संजय गांधी नगरचे स्मशान बौद्ध स्मशान भूमी ट्रस्ट ला देण्याची मागणी गेल्या 15-20 वर्षापासून प्रलंबीत आहे. त्यामुळे संबंधित स्मशानाचे "निर्वाण भूमी" असे नामकरण करून बौद्ध स्मशान भूमी ट्रस्टला देण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी पब्लिक पार्लमेंटचे संयोजक अँड. सिद्धार्थ गायकवाड, जेष्ठ आंबेडकरी साहित्यीक शिवा प्रधान, डॉ. अलीम पटेल,किरण गुडधे, धीरज मेश्राम, संजय महाजन, सय्यद फूझेल, भागवत मेश्राम, केशव वानखडे, अविनाश गोंडाने, एजाज भाई, अँड. भरत खडसे, अँड. रवि वर्ठे,  संदेश मेश्राम, मीनाताई नागदिवे, प्रतिभा प्रधान, सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages