सरसकट 50% शैक्षणिक शुल्क कपात करा याकरिता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची तातडीने भेट घेऊन निवेदन सादर केले. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 5 July 2021

सरसकट 50% शैक्षणिक शुल्क कपात करा याकरिता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची तातडीने भेट घेऊन निवेदन सादर केले.


मुंबई : 

माननीय उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन करताना नॅशनल स्टुडंन्ट्स युनियन ने ठणकावून सांगितले की किमान 50% शुल्क कपात करावी यासाठी आम्ही  सातत्याने पाठपुरावा केला आहे .डांगे समितीच्या अहवालाला येऊन तबल 9 महिने झाले तरी आपण यावर योग्य तो निर्णय घेतला नाही.राज्यातील आकृषी विद्यापीठाच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी वसतिगृह, जिमखाना, संगणक,क्रीडा,वैद्यकीय मदत ,ग्रंथालय, प्रयोगशाळा यासाठी आकारले गेलेले सर्व शुल्क सरसकट माफ तर करावेच त्याचबरोबर शिक्षण शुल्क(ट्युशन फी)सुद्धा 50% कमी करण्यात यावे अशी समस्त विद्यार्थी आणि पालकांची मागणी असताना आपण ग्रंथालय -प्रयोगशाळा शुल्कात फक्त 50% सवलत देत आहात तेही फक्त अनुदानित महाविद्यालयाना .जर का पुढील आठवड्यापर्यंत सरसकट सर्वच अभ्यासक्रम आणि सर्वच महाविद्यालयासाठी 50% शुल्क कपात जर लागू केली नाही तर नॅशनल स्टुडंन्ट्स युनियन आणि सर्व संघटना मिळून प्रत्येक तीव्र निदर्शने आणि धरणे आंदोलना ना सामोरं जावं लागेल .

No comments:

Post a Comment

Pages