शिवाजी महाराजांचे नौदल धोरण आजही देशाला दिशादर्शक : एयर मार्शल अजित भोसले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 6 June 2021

शिवाजी महाराजांचे नौदल धोरण आजही देशाला दिशादर्शक : एयर मार्शल अजित भोसले


नवी दिल्ली, दि. 6 : छत्रपती शिवाजी महाराजांचे नौदल धोरण आजही देशाला दिशादर्शक असल्याचे, प्रतिपादन एयर मार्शल अजित भोसले यांनी केले.

मध्ययुगीन काळातील घडामोंडीचा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांना कळुन चुकले होते की, ज्यांचे समुद्रात अधिपत्य स्थापित राहील तेच जमीनवरदेखील राज्य करू शकतात. त्यामुळे महाराजांनी तत्त्कालीन परिस्थीतीमध्ये नौदलाकडे विशेष लक्ष देऊन सामुद्रीक धोरण सशक्त केले. त्याचा खुप मोठा सकरात्मक प्रभाव त्याकाळत पाहायला मिळाला. तसेच स्वतंत्र भारताचा नौदलाचा पाया हा शिवाजी महाराजांमुळेच अधिक सशक्तपणे रचला गेला असल्याचे एयर मार्शल भोसले यांनी यावेळी सांगितले. 

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत एयर मार्शल अजित भोसले  यांनी ‘शिवाजी महाराजांचे नौदल धोरण’ या विषयावर 44 वे पुष्प गुंफताना बोलत होते. महाराष्ट्र शासन शिव राज्याभिषेक दिन हा दिवस 'शिव स्वराज्य दिन' म्हणून साजरा करीत आहे, या दिनाचे औचित्य साधून हे व्याख्यान आयोजित केलेले आहे. 

‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंद‍िता...... राजते’ या  शिवमुद्रेचे वाचन करून व्याख्यानाची सुरूवात एयर मार्शल भोसले यांनी केली.  6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला होता. या घटनेला यावर्षी 347 वर्ष पुर्ण झाली आहेत.  

  नौदलाच्या पंरपरा जुन्या असल्याचा उल्लेख करत एयर मार्शल भोसले म्हणाले, मौर्य,गुप्त, चालुक्य, चोल, पल्लव काळात सशक्त नौदल होते. या राज्यकर्त्यांनी समुद्रमार्गे सांस्कृतिक आणि राजकीय मोहिमा  राबविल्या. याचे पुरावे  जावा, सुमात्रा, ब्रम्हदेश, इंडोनशिया, मलाया, थांडलँड आदी देशात दिसतात.  प्राचीन काळातील भक्कम असलेली  नौदल पंरपरा मध्ययुगीन काळात रसातळाला पोहाचली होती. त्याला अनेक कारणे होती. याचा फायदा युरोपीयन वसाहतवादांनी घेतला. वासको- द-गामा यांच्या समुद्रमार्ग शोधानंतर इंग्रज, पोर्तुगीज, अन्यांनी ईस्ट इंडिया कंपन्या भारतात शक्तीच्या जोरावर स्थापन  केल्याचे त्यांनी सांगितले.

मध्ययुगीन काळातील सुजाण  राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतूनच नौदल उभे राहीले. असे सांगुन एयर मार्शल भोसले म्हणाले, मराठा साम्राज्याला त्यामुळे वेगळी बळकटी मिळाली. 17 व्या शतकाच्या मध्यापर्यंत नौदलाविषयक मराठयांची ताकत कमी होती.  पश्चिम घाट,  कोकण किनारपट्टीवर सिद्दीची पकड होती. त्यांच्याकडे मजबुत बोटी होत्या. यासह इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांचेही सामारिक पकड मजबुत होती, असे एयर मार्शल भोसले यांनी सांगितले. 


शिवाजी महाराजांना जाणीव होती की, जोपर्यंत समुद्रावर नियंत्रण होत नाही तोपर्यंत स्वराज्याचे स्वप्न साकार होऊ शकत नाही.   यासाठी त्यांनी 4 सामुद्रीक उद्देश ठेवले. यातील पहिला उद्देश कोकण किनारपट्टीची  सिद्द व युरोपीयन लोकांपासून सुरक्षा, स्वराज्य स्थापनेत उपद्रव निर्माण करणा-या परकियांना थांबविणे, कोकण किनारपट्टीवरून होणा-या व्यापार मार्गावरील आवक-जावकावर नियंत्रण करणे, मित्र राज्यांची समुद्रमार्गे होणारी लुट थांबविणे. हे चार उद्देश ठरवून नौदलाकडे लक्ष वळविले. याचा सकारात्मक परिणाम झाला.

    श्री भोसले यांनी यावेळी त्या काळात मल्हाराराव चिटणीस यांनी शिवाजी महाराजांबद्दल लिहीलेल्या चरित्रामध्ये शिवाजीच्या महाराजांच्या नौदलाविषयक माहिती देतांना स्थान‍िक लोकांनी शिवाजी महाराजाच्या या नौदल धोरणाला स्वत:हून पाठींबा देऊन ते नौदलात सामील झाले. असल्याचे लिहीलेल आहे, असे सांगितले.  यासह यामध्ये शिवाजी महाराजांनी जहाज बांधणीचे उचलले पाऊल आणि समुद्र किना-यावरील किल्ल्यांचा उल्लेख केला आहे. 1659-65 या दरम्यान  शिवाजी महाराजांनी एकूण 85 जहाजे निर्माण केली. यामध्ये  तीन मोठे जहाज होते. हे आरमार वाढत गेले. पुढे या आरमारीचे दोन प्रमुख सुभे (केंद्र) झालेत आणि त्यांचे प्रमुख सुभेदार म्हणुन ओळखले जाऊ लागले, अशी माहितीही एयर मार्शल अजित भोसले यांनी दिली. 

पुढे भोसले म्हणाले, यासह खाडी भागातील परिसरात शिवाजी महाराजांनी तटबंदी करायला सुरूवात केली. पुढच्या काळात समुद्रावरील वर्चस्वासाठी अनेक छोटया-मोठया लढाया महाराजांच्या नौदलाने लढल्या असल्याचे माहिती एयर मार्शल भोसले यांनी दिली. 

भारतीय इतिहासात चोल साम्राज्यानंतर शिवाजी महाराजांनीच राजकीय हेतुने आरमार उभे केले. जेणे करून स्वराज्याची स्थापना तसेच समुद्रावर अधिपत्य होऊ शकेल. स्वराज्य निर्मितीत शिवाजी महाराजांची महत्वकांक्षा ही एक सर्वसमावेशक राष्ट्रीय शक्ती बनविण्यासाठी होती. आरामारा हे त्यासाठी अत्यावश्यक असुन त्याची जाण बाळगुण माणसे संघटीत केली. तंत्रज्ञान आत्मसात केले. तसेच शत्रुला सडेतोड झुंज दिली. एका नवीन सामुद्रीक लष्करी पंरपरेला जन्म दिला. याच पायावर एक  शक्तीशाली आरमार सरखेल कान्होजी आंग्रेच्या नेतृत्वात उभे राहिले होते. पुढे अनेक वर्ष या आरमाराने सिद्दीवर आणि इतर परकीयांवर कायम अंकुश ठेवला होता. पुढील काळातही सामुद्रिक लढाया होत राहील्या अशी माहिती श्री भोसले यांनी दिली. 

शिवाजी महाराजांचे कारभारी असलेले रामचंद्र अमात्य यांनी आरमाराविषयी लिहून ठेवलेले शब्द आजही महत्वपुर्ण असल्याचे सांगुन,  त्‍यांनी असे लिहीले होते  ‘आरमार हे नितांत आवश्यक विभाग आहे. ज्याकडे सशक्त नौदल आरमार असते, त्यांच्याकडे समुद्र असतो. आणि ज्याचा समुद्र आहे त्याचे जमिनीवर अधिपत्य असते.’ भारतीय नौदल हे शिवाजी महाराजांनी रचलेल्या आरमारीच्या पायावर उभे असल्याचे एयर मार्शल अजित भोसले यांनी  सांगितले. 


यावेळी भोसले यांनी  रणजीत देसाई लिखित ‘श्रीमान योगी’  मधील शिवाजी महाराजांचे चरित्र कसे होते याचे वाचन केले. सोबत संत रामदास यांनी शिवाजी महाराजाबद्दल केलेले गौरवास्पद काढलेले वाक्यही उदबोधीत केले.


No comments:

Post a Comment

Pages