बंद केलेला रेल्वेगाड्या सुरू करा ; रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उद्धव रामतीर्थकर यांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 5 June 2021

बंद केलेला रेल्वेगाड्या सुरू करा ; रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उद्धव रामतीर्थकर यांची मागणी

किनवट , दि.५ :  कमी उत्पन्न होत असल्याचे कारण देत  किनवट व माहूर तालुक्यातील नागरीकांकरीता अत्यंत उपयुक्त अशा आदीलाबाद ते नांदेड इंटरसिटी एक्सप्रेस व आदिलाबाद ते मुंबई विशेष नंदिग्राम एक्सप्रेस  या दोन महत्वाच्या रेल्वे गाड्या रेल्वे प्रशाननाने बंद केल्या आहेत. 

    रेल्वे प्रशासनानाने बंद केलेल्या  रेल्वे गाड्या पूर्ववत चालू कराव्यात, अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उद्धव रामतीर्थकर यांनी नुकतीच रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या संबधी ते दक्षिण मध्य रेल्वे च्या नांदेड विभागाच्या विभागीय व्यवस्थापकांची भेट लवकर घेणार आहेत.  आदिलाबाद ते नांदेड इंटरसिटी व आदिलाबाद ते मुंबई नंदिग्राम विशेष एक्सप्रेस या गाड्यांचे  उत्पन्न कमी का झाले याचे कारणही  ते रेल्वे प्रशासनाला व अधिकाऱ्यांना समजावुन सांगणार आहेत.

       किनवट व माहूर तालुक्यातील ग्रामिण व शहरी भागातील नागरीक जिल्ह्याचे ठीकाण असलेले नांदेड येथे कार्यालयीन कामे व आरोग्य विषयक सुविधा प्राप्त करण्याकरिता ये-जा करत असतात. त्याकरिता सकाळी ८:४५ वाजता सुटणारी इंटरसिटी एक्सप्रेस ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच मुंबई सह राज्याच्या विविध ठीकाणी प्रवास करण्याकरिता नंदिग्राम ही गाडी उपयुक्त ठरते. 

       सदर दोन्ही रेल्वे गाड्या सुरु झाल्यास किनवट माहूर तालुक्यातील लहान मोठे व्यवसायीकांना लाभ होणार आहे. या गाड्यावर ये-जा करणारे व या गाड्यामुळे ज्यांच्या जिवनाचा गाडा चालतो अशा नागरीकांना खुप मोठा आधार प्राप्त होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनानाने टीकिट तपासणीस मार्फत होत असलेली ही टीकिट चोरी थांबवुन रेल्वे स्थानकावर टीकिट विक्री चालु करावी व जास्तीत जास्त प्रमाणात रेल्वेगाड्या सुरु कराव्यात, अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उद्धव रामतिर्थकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages