मुंबई दि. 10- मुंबईत मालवणी येथे तीन मजली ईमारत बाजूच्या दुमजली घरांवर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात 11 जणांचा मृत्यू झाला असून 8 लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना मुंबई मनपा ने 5 लाख रुपयांची सांत्वनपर मदत द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.
आज दुपारी मालाड मालवणी गेट नंबर 8 येथील न्यु कलेक्टर कॉलनी येथील दुर्घटनाग्रस्त स्थळाला ना रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषी मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. पुन्हा अशी दुर्घटना घडू नये याची मुंबई मनपा ने खबरदारी घ्यावी. असे आवाहन ना रामदास आठवले यांनी मुंबई मनपा आणि राज्य सरकार ला केले आहे.
यावेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव; तालुका अध्यक्ष सुनील गमारे; मुंबई महिला आघाडी अध्यक्ष ऍड.अभया सोनवणे; व्यापार आघाडी अध्यक्ष पोपटशेठ घनवट; आदी अनेक रिपाइं कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment