खेरडा मधील समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 9 June 2021

खेरडा मधील समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

परभणी : जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील खेरडा या गावात दोन जातीयवादी समाजकंटकांनी गावातील बौद्ध समाजातील बांधवांना आणि भगिनींना जातीयवाचक शिवीगाळ करीत अवमान केला या प्रकरणी आज घटनास्थळ असणाऱ्या खेरडा गावाला आज भेट दिली, पीडित गावकऱ्यांशी संपर्क साधून ता.पाथरी ( जिल्हा परभणी ) येथील पाथरी पोलीस स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडी / युवा आघाडी पाथरी तालूका वतीने आरोपींवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत , मोक्का अंतर्गत आणि हे प्रकरण जलदगती न्यायालय मध्ये चालवून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीचे निवेदन आज देण्यात आले , यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते मा. ओंकारभाऊ कांबळे , पाथरी तालुका चे मा. विकी अवचार, मा. शामराव ढवळे , मा. विठ्ठलदादा पंडित, मा. दिलीप मोरे, मा. आवडाजी ढबळें, मा. सदाशिव घागरमाले, मा. राजेश गोटे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

Pages