इंधन दरवाढ विरोधात रिपब्लिकन सेनेचे अनोखे पध्दतीने निषेध मोदी चॉकलेट वाटून केला सरकारचा निषेध व्हॅट रद्द करून इंधन चे दर आटोक्यात आणण्याची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 11 June 2021

इंधन दरवाढ विरोधात रिपब्लिकन सेनेचे अनोखे पध्दतीने निषेध मोदी चॉकलेट वाटून केला सरकारचा निषेध व्हॅट रद्द करून इंधन चे दर आटोक्यात आणण्याची मागणी

औरंगाबाद (११ जून २०२१):  पेट्रोल, डिझेल खाद्य तेल आणि घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीने औरंगाबादेत जोरदार आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत ' मोदी चॉकलेट' वाटण्यात आले. पंतप्रधान नरेंद मोदी केवळ आश्वासननाचे ' चॉकलेट' वाटतात. सर्वसामान्यांकडे त्यांचे लक्ष नाही, इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

तसेच महाविकास आघाडी सरकारने अबकारी कर कमी करून इंधन चे दर आटोक्यात आणावे अश्या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.

दिल्ली गेट येथील पेट्रोल पंम्पसमोर तसेच रांजणगाव (शे.पू) येथे शुक्रवारी (दि.११) हे अनोखे आंदोलन करण्यात आले. ‘रद्द करा रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा’, ‘या सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय’, अशी घोषणाबाजी करत रिपब्लिकन सैनिकांनी संपूर्ण परिवार  दणाणून सोडला.

 पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहन चालकांना ' मोदी चॉकलेट' देण्यात आले. इंधनाच्या दराचे आकडे असलेले फलक तसेच बनावट रॅपर असलेले 'मोदी चॉकलेट'  हवेत उंचावत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

  जिल्हाध्यक्ष प्रा. सिद्बोधन मोरे, काकासाहेब गायकवाड, यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले तर मराठवाडा संघटक आनंद कस्तुरे,रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम, मनीषा साळुंके, चंद्रकांत रुपेकर, सचिन गायकवाड, विकास हिवराळे, गौतम गायकवाड, बबन साठे, कैलास निळे, राहुल कानडे, शैलेंद्र म्हस्के, दिनेश गवळे, सचिन जगधने, दीपक जाधव, कुणाल भालेराव, सागर प्रधान, सचिन शिंगाडे, रामराव नरवडे, पप्पू दाभाडे, प्रवीण बनकर, रवी मोरे, नंदू मनोहर, कृष्णा मोरे, आनंद भिसे, पुष्पा स्वामी, के.जी.पवार, जय कारके, मयूर पवार आदींसह रिपब्लिकन विद्यार्थी सेना,रिपब्लिकन कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment

Pages