वंचित बहुजन आघाडीचे दौंड तहसील कचेरी येथे हलगी नाद आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 11 June 2021

वंचित बहुजन आघाडीचे दौंड तहसील कचेरी येथे हलगी नाद आंदोलन

पुणे  :  खाजगी शिक्षण संस्थेनी जे सक्तीने फी वसुली चालू केलेली आहे ती तात्काळ थांबवावी व करोना काळातील सर्व विद्यार्थ्यांची मागील एक वर्षापासूनची फी ही माफ करावी यासाठी दौंड तहसील कचेरी येथे हलगी नाद आंदोलन करण्यात आले.

       गेल्या दीड वर्षापासून कोरोना सारख्या महामारी ने थैमान घातला असताना, अर्थ व्यवस्था विस्कळीत झालेली असताना, शिक्षण संस्था ही वसुली करते, व शासन या खाजगी शिक्षण संस्थांची पाठराखण का करत आहे? 

       शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या नावे हे निवेदन देण्यात आलेले आहे, नायब तहसीलदार आखाडे यांनी हे निवेदन स्वीकारले. त्यावेळी भीम क्रांती सेना या सामाजिक संघटनेने देखील आपला पाठिंबा दर्शविला. 

या निवेदनात खालील चार मागण्या करण्यात आलेले आहे.

१. कोरोना काळातील मागील वर्षभराची फी माफ करावी.

२. कोरोना काळातील (फी) या कारणाने कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये किंवा त्यांची अडवणूक होता कामा नये.

३. शैक्षणिक संस्थांच्या (फी) च्या दबावामुळे जर कुठल्या पालकांचं काही बर वाईट झालं तर त्यास सर्वस्वी शैक्षणिक संस्थेत जबाबदार धरण्यात येईल.

४. ज्या शैक्षणिक संस्था ज्यादा (फी) आकारात असेल त्यांची चौकशी करून त्यांची मान्यता रद्द करावी. 

   यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन अशोक वाघमारे, उपाध्यक्ष रमेश तांबे  ऍड.किरण लोंढे ता. सचिव अजिंक्य गायकवाड, दौंड शहर मुख्यसचिव अक्षय शिखरे,शहर उपध्यक्ष अजगर शेख, शहर संघटक राहुल नायडू ,सचिन शिपलकर पाटील,शिवा खरारे, विकी कांबळे,राजेश ओव्हाळ, राजु जाधव अभिषेक जाधव, उमेश नडगमकर, रुपेश जगताप,यश भालसेन ,अनिकेत जाधव. भिमक्रांती सेनेचे अध्यक्ष बंटी वाघमारे, उपाध्यक्ष रितेश सोनवणे, सुरज जगताप ,सुमित सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages