मुलगा मुस्लीम आणि मुलगी ब्राम्हण बौद्धधम्म स्वीकारुन केला विवाह जातीची बंधनं झुगारुन तरुण-तरुणीने केला विवाह नालंदा बुध्द विहरात बांधली लग्नगाठ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 11 June 2021

मुलगा मुस्लीम आणि मुलगी ब्राम्हण बौद्धधम्म स्वीकारुन केला विवाह जातीची बंधनं झुगारुन तरुण-तरुणीने केला विवाह नालंदा बुध्द विहरात बांधली लग्नगाठजालना : प्रेम जडले तर त्याला ना जातीची बंधनं आडवतात, ना रंगाची, प्रेमात वयालाही थारा नाही, अशाच एका मध्यप्रदेशातील तरुण-तरुणींनी जालना येथे जातीची बंधनं झुगारुन विवाहबध्द होण्याचं धाडस केलं. आणि आपल्या वैवाहीक जिवनाला सुरुवात केली. हा विवाह जालना येथील नालंदा बुध्द विहारात बौध्द धम्माच्या पध्दतीनुसार पार पडला. 

नालंदा बुद्ध विहार संघभूमी नागेवाडी येथे पूज्य भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर यांच्या आदेशान्वये व दारक दारिका यांच्या स्वेच्छेने नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी आंतरजातीय- आंतरधर्मीय व  आंतर राज्जीय विवाह (मंगलपरिणय) बौद्ध पध्दतीनुसार पार पाडण्यात आला. दरम्यान भदंत शिवली शाक्यपुत्र  यांनी त्यांना पंचशिल  बावीस प्रतिज्ञा सह धम्मदीक्षा दिली. जुनेजा एकबाल उस्मानभाई हे मुस्लिम (गुजरात) दारकाचे नाव होते. तर आकांक्षा बिपिन ठाकूर हे ब्राह्मण (मध्यप्रदेश) दारिका चे नाव होते.

दरम्यान दोघाही वधू-वराने  आपण ब्राह्मण आणि मुस्लिम असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली, व स्वधर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार करतो असे त्यांनी प्रतिज्ञा घेतांना म्हटले. आज-काल बौद्ध धम्माचे तत्वज्ञान वाचणे हे अत्यावश्यक  झाले आहे, असे त्यांनी सांगीतले. आज-काल तरुण पिढीला बौद्धधम्म हा आकर्षित करणारा आहे. बौद्ध धम्माचे तत्त्वज्ञान हे मानवतावादी व अहिंसा शिकवणारे आहे. मैत्री, करुणा, प्रज्ञा ,शील, समाधी, ची शिकवण देणारे आहे. आज जगाला युद्ध नाही तर बुद्धाची आवश्यकता आहे, अशी त्यांनी प्रतिक्रिया विवाहबध्द झालेल्या दांम्पत्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या दरम्यान अ‍ॅड. मोकळे व अ‍ॅड. राऊत हे सह मित्रपरिवार उपस्थित होते. या दोघाही वधू-वरांनी आंतरजातीय-आंतरधर्मीय आंतरराज्य विवाह केला. स्वधर्माचा( जन्मजात धर्माचा) त्याग करून बौद्ध धम्माचा स्वेच्छेने कायदेशीर, सनदशीर मार्गाने नालंदा बुद्ध या ठिकाणी स्वीकार केला. दरम्यान भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले.

No comments:

Post a Comment

Pages