मैत्री थाई प्रोजेक्ट च्या माध्यमातून थाईलैंड च्या उपासंका द्वारे 31 रुग्णवाहिकेचे दान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 10 July 2021

मैत्री थाई प्रोजेक्ट च्या माध्यमातून थाईलैंड च्या उपासंका द्वारे 31 रुग्णवाहिकेचे दान

पुणे : 

कोरोना च्या संकटा मधे थाईलैंड चे पूजनीय भंते अजाहन जयासारो  आणि त्यांचे थाई बौद्ध धम्म उपासकांनी,  डॉ.     हर्षदीप कांबळे (IAS) आणि रोजाना कांबळे  यांच्या सहकार्याने भारता मधे 31 रुग्णवाहिका चे दान दिले आहे . आज  पुण्यामधे टाटा मोटर्स या ठिकाणी रुग्णवाहिकांचे भिक्षु संघाच्या उपस्थिती मधे लोकार्पण करण्यात आले | या अतिशय प्रेरणादायी कार्यक्रमाला थाईलैंड चे कॉन्स्युलेट जनरल  श्री सिरिकुल  हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.

 भगवान बुद्ध  उपदेश देतांना सांगतात जो  प्रतित्यसमुत्पादाला  जाणतो तो धम्माला जाणतो अर्थात हे जग एकमेकांवर निर्भर आहे. भगवान बुद्ध दानपारमितेला अत्यधिक महत्व देतात,ही शिकवण अखिल मानव जातीसाठी प्रेरणादायी आहे.

भारतामधे जेव्हा कोरोना ची दूसरी लाट उंचीवर होती तेव्हा दुःख, वेदना आणि चिंतेने ग्रस्त भारतीयांसाठी थाईलैंड च्या बौद्ध उपासक़ांनी मदती चा हाथ दिला | 

संवेदनशीलता, दानपारमिता, मैत्रीभावना, समर्पण आणि महाकरुणा या बुद्ध वचनांचा अनोखा मिलाप दोन्ही देशांचा दुवा ठरला.


मैत्री थाई प्रोजेक्ट च्या माध्यमातून थाईलैंड मधील थेरवादा फ़ॉरेस्ट ट्रेडिशन चे परमपूजनीय भंते अजान जयासारो  यांच्या आव्हाना नुसार थाईलैंड च्या बौद्ध उपासक़ांनी भारतीय जनतेसाठी बुद्धांनी संगितलेल्या दानभावने नुसार  31रुग्णवाहिकेची ची बहुमोल अशी मदत केली आहे | 


महाराष्ट्रा चे उद्योग आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्या  माध्यमातून ही सर्व मेडिकल सहायता भारताला प्राप्त झाली. त्यापैकी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर  आणि व्हेंटिलेटर चे यापूर्वी वितरण झालेले आहे तर  31रुग्णवाहिकांचा लोकार्पण समारोह आज पुण्या मधे पार पडला.No comments:

Post a Comment

Pages