किनवटच्या नागरिकांची पेट्रोल-डिझेल पासून लवकरच होईल सुटका..! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 20 July 2021

किनवटच्या नागरिकांची पेट्रोल-डिझेल पासून लवकरच होईल सुटका..!

किनवट,  : भविष्यातील इंधन टंचाईवर मात करून देशातच इंधन तयार करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली असून, शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात एक गॅस प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच  जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून किनवट तालुक्यात बायो-सीएनजी व सेंद्रीय खत तयार करण्यात येणार असून, त्यामुळे तालुक्याच्या विकासासह रोजगाराची निर्मिती होईल, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष विनायक गव्हाणे यांनी दिली.


     पुढे अधिक माहिती देतांना ते म्हणाले की, बायो ‘सीएनजी’ म्हणजे गवत, काडीकचरा इत्यादी पासून नैसर्गिकरीत्या गॅस तयार करण्यात येतो. ज्यावर आता शहरातील मोटरसायकल, ऑटो,  कार  चालणार आहेत. त्यामुळे वाढत्या पेट्रोल व डिझेल किंमती पासून कायमची मुक्तता होणार असून,  किनवट तालुका इंधनामध्ये स्वयंपूर्ण होऊन देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये वाटा उचलणार आहे.  किनवट शहरामध्ये मोटरसायकल, आटो, कार ह्या वाहनासाठी बायो ‘सीएनजी’ गॅसपंम्पसुद्धा सुरु होणार आहेत. त्याच बरोबर घरगुती गॅस सुद्धा तयार होणार आहे. सेंद्रीय खत शेतकर्‍यांना दोन वर्ष मोफत देऊन सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे; तर मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येईल. मात्र यासाठी नागरिकांनी नोंदणी करून सभासद होणे आवश्यक आहे.


   ‘बायो-सीएनजी’ पासून शेतकर्‍यांनाही वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न एका एकर मध्ये मिळणार आहे. पूर्णपणे सेंद्रीय खतांवर आधारीत  गवत शेतकर्‍यांनीच शेतात लावायचे आहे.  त्यामुळे जमिनीच पत सुधारेल व  गॅसही मिळेल. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ‘सीएनजी’अतिशय फायदेशीर असल्याने, दुहेरी फायदा आता किनवट तालुक्यातील नागरीकांना मिळणार आहे. त्यामुले लवकरात लवकर एम.सी.एल, गव्हाणे बायोफ्युल  व जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडे संपर्क करून याचे सभासद व्हावे आणि भविष्यामध्ये विविध योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विनायक गव्हाणे, चंपतराव जाधव, सुरेश सोळंके पाटील, सौ.सुमनताई तिडके, राजू पाटील साळुंखे, बाळकृष्ण कदम, गौरव नेम्मानीवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages