पीपल्स एज्युकेशन सोसायटीची अधोगती थांबविन्यासाठी पुढे येणे आजी माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्य ; आजी-माजी विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी संवाद अभियान राबवणार ; "माझ्या नागसेनवनात एक वृक्ष माझाही"ह्या वृक्षारोपण अभियानास मोठा प्रतिसाद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 8 July 2021

पीपल्स एज्युकेशन सोसायटीची अधोगती थांबविन्यासाठी पुढे येणे आजी माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्य ; आजी-माजी विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी संवाद अभियान राबवणार ; "माझ्या नागसेनवनात एक वृक्ष माझाही"ह्या वृक्षारोपण अभियानास मोठा प्रतिसाद

औरंगाबाद : 

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी लढा देणे हे प्रत्येक आजी माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे.संस्थेची अधोगती थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येणे हे विद्यार्थी म्हणून आपले कर्तव्य आहे असा सूर आज पीपल्स च्या वर्धापनदिनी उपस्थितांमध्ये उमटला.

 लुम्बिनी उद्यान नागसेनवनात पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत वर्धापन दिन साजरा केला.  

मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेयर असोसिएशनच्या वतीने "माझ्या नागसेनवनात एक वृक्ष माझाही" हे अभियान राबवून शेकडो वृक्ष लावण्यात आले.


संस्थेच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आता संस्थेच्या विकासासाठी हातभार लावणे गरजेचे आहे आपल्यापरीने सर्वांनी योगदान द्यावे आज संस्थेला माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याची नितांत गरज आहे असे आवाहन डॉ.प्रमोद दुथडे यांनी केले.

 येथील अपप्रवृत्ती ना पिटाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी संघटित लढा उभारावा असा सूर विद्यार्थ्यांत उमटला.

  पीपल्स चे आजी माजी विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी जिल्हानिहाय संपर्क अभियान राबविणार असल्याचे सचिन निकम यांनी सांगितले 

ह्या अभियानांतर्गत नागसेनवनातील विविध महाविद्यालयाच्या प्रांगणात १८० वृक्ष लावण्यात आले त्यात पिंपळ,केसरआंबा,वड,करंज,चाफा,सीताफळ,जांभूळ,बोगण वेल,मोहगणी,गुलमोहर,शिसम,बदाम,तेंभुर्णी,हिरडा,शेवरी,पळस,खिरणी,मोह,भिलावा,भोकर,

गुलाबजाम अशी एकूण वीस प्रजातीचे वृक्ष लावण्यात आले.

 लुम्बिनी उद्यान नागसेनवन,डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय,पी एस एस पॉलिटेक्निक महाविद्यालय,मिलिंद महाविद्यालय येथे हे वृक्षारोपण करण्यात आले.


प्रसेनजीत गायकवाड,डॉ.किशोर सूर्यवंशी,पंकज भारसाखळे,सुशीला खडसे,अनिल जाधव,प्रा.विशाल मोरे,सतीश जाधव,मुकेश घुमारे, डॉ.ईश्वर मंझा,शुभम हनवते,डॉ.धनंजय रायबोले,डॉ.अरुण कोळी,रुपराव खंदारे,प्रबोधन बनसोडे आदींसह अनेकांनी 


ह्यावेळी प्राचार्य.भास्कर साळवी,प्राचार्य डॉ.प्रमोद हिरोडे, प्राचार्य टी ए कदम,प्राचार्य डॉ.राठोड, डॉ.प्रमोद दुथडे,जनार्धन म्हस्के,प्रा.प्रियानंद आगळे,सिद्धार्थ मोकळे,अधिसभा सदस्य राहुल म्हस्के,डॉ.अविनाश सोनवणे,प्रा.सिद्धोधन मोरे,काकासाहेब गायकवाड,प्रा.किशोर वाघ,डॉ.देवानंद वानखेडे,ऍड.धनंजय बोरडे,मिलिंद बनसोडे,रुपराव खंदारे,ऍड.आगळे,स्वच्छता निरीक्षक अनिल जाधव,डॉ.अरुण शिरसाठ, डॉ.महादेव उबाळे,डॉ.निलेश आंबेवाडीकर,राहुल कानडे विक्रम जगताप,यांची उपस्थिती होते.

तर ऍड.अतुल कांबळे, इंजि.अविनाश कांबळे, प्रसेनजीत गायकवाड,प्रा.प्रबोधन बनसोडे,गुणरत्न सोनवणे,तुषार अवचार,सचिन भुईगळ,मुकेश घुमारे,स्वप्नील गायकवाड, अविनाश डोंगरे,पवन पवार ,आनंद सुर्यवंशी,किरण शेजवळ, सुमित नावकर,सतीश जाधव,सिद्धार्थ उबाळे,विकास रोडे,सम्यक सरपे,राजू गडकर,राहुल अंभोरे,कपिल बनकर,आशीष मनोरे,अतुल गडकर,संजय पाटोळे,महेंद्र मगरे,प्रेम ढगे,सचिन शिंगाडे,शैलेंद्र म्हस्के,संकेत कांबळे आदींनी परिश्रम घेतले.No comments:

Post a Comment

Pages