राज्य राणी एक्स्प्रेस मधील दहा डब्बे नांदेड ते मनमाड दरम्यान प्रवाशांसाठी उपलब्ध, परभणी ते नांदेड दरम्यान अनारक्षित प्रवासी रेल्वे सुरु होणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 16 July 2021

राज्य राणी एक्स्प्रेस मधील दहा डब्बे नांदेड ते मनमाड दरम्यान प्रवाशांसाठी उपलब्ध, परभणी ते नांदेड दरम्यान अनारक्षित प्रवासी रेल्वे सुरु होणार

 नांदेड : 

राज्य राणी एक्स्प्रेस चे दहा डब्बे प्रवाशांना मनमाड पर्यंत उपलब्ध झाले आहेत : गाडी संख्या ०७६११ नांदेड ते मुंबई सी.एस.एम.टी.  राज्य राणी एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत सुरु आहे. या गाडीतील १७  डब्या पैकी १० डब्बे हे नांदेड ते मनमाड दरम्यान लॉक करूनच आत्तापर्यंत हि गाडी धावत होती. १७ पैकी फक्त ०७ डब्बेच नांदेड –परभणी –जालना-औरंगाबाद येथील प्रवाशांकरिता नाशिक-कल्याण-ठाणे - मुंबई  ला जाण्यासाठी उपलब्ध होते.  या लॉक केलेल्या १० डब्यांचा प्रवाशांना उपयोग होत नव्हता. हे डब्बे मनमाड ते मुंबई दरम्यान च्या प्रवाशांकरिता मध्य रेल्वे तर्फे उपलब्ध करण्यात येत होते. 


 नांदेड रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयी करिता हे दहा डब्बे लॉक करून गाडी चालविण्या ऐवजी हे डब्बे प्रवाशांकरिता फक्त नांदेड ते मनमाड दरम्यान उपलब्ध करून दिले आहेत. नांदेड विभागातून आता मनमाड पर्यंत आरक्षण करता येणार आहे. याचा प्रवाशांना मनमाड येथून धावणाऱ्या उत्तर भारतात तसेच दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्या पकडण्याकरिता उपयोग होईल. तसेच याने शिर्डी ला जाणाऱ्या  प्रवाशांनाही या १० डब्यांचा उपयोग होयील. मुंबई कडे जाणाऱ्या दुसऱ्या गाड्याही पकडता येतील.  परंतु या दहा डब्यांत मनमाड च्या पुढे आरक्षण करता येणार नाही. हे दहा डब्बे पूर्वी प्रमाणेच मध्य रेल्वे तर्फे मनमाड आणि त्या पुढील रेल्वे स्थानकावरून मुंबई कडे  प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकारिता पूर्वी प्रमाणेच राखीव /उपलब्ध असतील. 


 गाडी संख्या ०७६७२ परभणी ते नांदेड सवारी गाडी (अनारक्षित) : पूर्वी ०७६६५ या क्रमांकाने परभणी ते नांदेड दरम्यान धावणारी सवारी गाडी दिनांक १८ जुलै पासून तिचा नंबर बदलून नवीन नंबर ०७६७२ नुसार परभणी ते नांदेड दरम्यान सुरु होत आहे. हि गाडी सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. हि गाडी  अनारक्षित असेल. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा. या गाडीच्या वेळा आणि थांबे पूर्वी प्रमाणेच असतील. 

तसेच गाडी संक्ख्या ०७६९२ तांडूर ते परभणी एक्स्प्रेस दिनांक १७ जुलै पासून पूर्वी प्रमाणेच तांडूर ते परभणी दरम्यान धावेल. हि गाडी काही काळ सिकंदराबाद ते तांडूर आणि नांदेड ते परभणी दरम्यान अंशतः रद्द होती, सिकंदराबाद –नांदेड अशी धावत होती. 

 तसेच गाडी संख्या ०७६९१ नांदेड ते तांडूर एक्स्प्रेस १६ जुलै पासून पूर्वी प्रमाणेच नांदेड ते तांडूर दरम्यान धावेल. हि गाडी काही काळ सिकंदराबाद ते तांडूर दरम्यान रद्द करण्यात आली होती. 

 

No comments:

Post a Comment

Pages