"ओ शेठ तुम्ही नादच केला थेट , महागाई व बेरोजगारी वाढवली थेट "औरंगाबाद येथे बेरोजगारी व महागाई विरोधात विद्यार्थ्यांचे निदर्शने - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 19 July 2021

"ओ शेठ तुम्ही नादच केला थेट , महागाई व बेरोजगारी वाढवली थेट "औरंगाबाद येथे बेरोजगारी व महागाई विरोधात विद्यार्थ्यांचे निदर्शने

 औरंगाबाद :    डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळ सकाळी 11 वाजता विविध संघटना  कडून वाढती महागाई आणि वाढती बेरोजगारी  विरोधात निदर्शने करण्यात आले यावेळी सर्व विद्यार्थी संघटनेच्या वतीने विविध मागण्याला घेवून निदर्शने करण्यात आले यामध्ये  नव्या भांडवली व खाजगिकरणाची प्रक्रिया , सहकारी सोसायट्या, शिक्षण सम्राटाच्या संस्था  यात नव्या उच्चभ्रू लोकांनी व राज्य व केंद्र सरकारनें हस्तक्षम न केल्यामुळे देशामध्ये महागाई व बेरोजगारी वाढली आहे  असा सर्वच विद्यार्थी संघटनेचा रोष होता. यात सत्यशोधक विद्यार्थी संघटना औरंगाबाद यांनी "ओ शेठ तुम्ही नादच केला थेट , महागाई व बेरोजगारी वाढवली थेट " या प्रसिद्ध झालेल्या गीताचे विडंबन करून राज्य व केंद्र सरकारला थेट जाब  विचारून सहभाग नोंदवला यावेळी राज्याध्यक्ष अमोल खरात , जिल्हा प्रमुख निशिकांत कांबळे, राज्य सदस्य तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे सचिव सुरेश सानप , दीपक भाऊ पगारे , किरण बनसोडे, अविनाश सिताफुले ,आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.  तर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने प्रकाश इंगळे यांनी राजे व केंद्र सरकारने प्राध्यापक भरती केंद्रीय पद्धतीने करावी अशी  मागणी केली ,राहुल खंदारे,  संदीप तुपसमुद्रे, जयश्री शिर्के, sfi च्या वतीने लोकेश कांबळे यांनी महागाई व बेरोजगारी संदर्भात हल्ला बोल करीत जाब विचारला ,नितीन वाहूळे ,सत्यजित मस्के , ऑल इंडिया पँथर च्या वतीने राहुल मकासरे यांनी मत व्यक्त केले तर इतर प्रथम कांबळे बाबा तीवारी आमोल शेजवळ, विकास शेजवळ ,कपील गायकवाड, बंटी सदाशिवे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने अमित कुटे ने मत व्यक्त केले यावेळी अमोल दांडगे ,  दीक्षा पवार , सादिक शेख,  पांडू भुतेकर..

NSUI  विद्यापीठ अध्यक्ष योगेश बहादूरे , शुभम खांद्रे , निलेश धस, भीमराव मोटे ,केशव नेमेकर या संघटना आणि इतर ही संघटना यावेळी सहभागी होत्या , प्रशासन प्रतिनिधी म्हणून पोलीस पदाधिकारी भाटेकर सर यांना निवेदन देऊन निर्दर्शन थांबवन्यात आली.



No comments:

Post a Comment

Pages