गोकुंदयातिल प्रत्येक वार्डात स्वछता मोहीम राबवा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 29 July 2021

गोकुंदयातिल प्रत्येक वार्डात स्वछता मोहीम राबवा

 

किनवट : तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुंदा ग्रामपंचायत क्षेत्रात सध्या दुर्गंधीमुळे तसेच स्वच्छते अभावी मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून या डेंग्यूच्या प्रभावामुळे गोकुंदा येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत  व आरोग्य विभागाने गोकुंदा हद्दीतील प्रत्येक वार्डात स्वच्छता मोहीम राबवून जंतुनाशक फवारणी करावी या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पठाण आजीज खान यांनी गोकुंदा ग्रामपंचायतकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.

 निवेदनात नमूद केले आहे की किनवट तालुक्यातील सर्वात मोठी व सर्वात जास्त महसूल उत्पादन देणारी ग्रामपंचायत म्हणून गोकुंद्याला ओळखले जाते परंतु या ग्रामपंचायतकडून मागील  कित्येक दिवसापासून स्वच्छता मोहीम न राबविल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे बहुतांश ठिकानी नालेसफाईची कामे न केल्यामुळे सध्या पावसाळ्याच्या दिवसात नाल्यातील घाण पाणी सार्वजनिक रस्त्यावर येऊन चिखल व दुर्गंधी तयार होत आहे या दुर्गंधीमुळे  डेंग्यूचा फैलाव वाढला असून प्रौढ व्यक्तीसह लहान  बालकांना सुद्धा डेंगूचा आजार जडू लागला आहे दुर्गंधी बरोबरच ठिकठिकाणी साचून असलेल्या पाण्यामुळे व कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे हिवताप, मलेरिया, अशा संसर्गजन्य  आजाराचा फैलाव वाढून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे नालेसफाई व दुर्गंधी संदर्भात येथील नागरिकांनी अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी केल्या मात्र ग्राम पंचायत प्रशासन लोकांच्या तक्रारीकडे  जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पठाण अजित खान यांनी निवेदनात केला आहे कोरोना सारख्या  जीवघेण्या आजारामुळे अगोदरच नागरिक भयभीत असताना त्यात आता स्वच्छते अभावी  डेंग्यू  आजाराने थैमान घातल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने तात्काळ डेंगूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गोकुंदा येथे प्रत्येक वार्डात स्वच्छता मोहीम राबवून जंतुनाशक फवारणी करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे पठान अजीज खान यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Pages