मुंबई महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा आरक्षित कराव्यात ; गौतम सोनवणे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्त यूपीएस मदन यांची भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 29 July 2021

मुंबई महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा आरक्षित कराव्यात ; गौतम सोनवणे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्त यूपीएस मदन यांची भेट

मुंबई दि. 29 - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीच्या 13 टक्के आणि अनुसूचित जमातीच्या  7 टक्के जागा आरक्षित करून लोकप्रतिनिधीत्व संविधानिक तरतुदीनुसार देण्यात येत आहे. त्या प्रमाणे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी 13 टक्के आणि अनुसूचित जमाती साठी 7 टक्के जागा आरक्षित केल्या पाहिजेत या मागणीसाठी आज केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांची भेट घेतली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव सुमित वजाळे; प्रविण मोरे उपस्थित होते. 


मुंबई महापालिकेच्या 228 जागांपैकी केवळ 11 जागा या अनुसुचित जाती साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई मनपा मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात एस सी एस टी च्या जागा आरक्षित करण्यात आल्या पाहिजेत.मात्र अद्याप लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती जमातीला न्याय्य वाटा मिळालेला नाही याबाबत गौतम सोनवणे यांनी राज्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांचे लक्ष वेधले. लोकसंख्येच्या प्रमाणात मुंबई मनपा मध्ये एस सी एस टी च्या जागा आरक्षित कराव्यात अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आली आहे. मुंबई मनपाच्या   सन 1818 सालच्या कायद्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात मनपा च्या प्रभागांची संख्या निर्धारित करण्याचे नमूद आहे. याबाबत  कायद्यानुसार योग्य तो विचार करण्यात येईल असे आश्वासन राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी गौतम सोनवणे यांना आश्वासन दिले.  


                  

No comments:

Post a Comment

Pages