शुल्कामध्ये सूट देण्यात यावी - स्वप्निल इंगळे पाटील . - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 29 July 2021

शुल्कामध्ये सूट देण्यात यावी - स्वप्निल इंगळे पाटील .


नांदेड प्रतिनिधी :

                मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेक पालक बेरोजगार झाले असून त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात संलग्नित विद्यापीठात शिकणारी बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून त्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे संलग्नित महाविद्यालय व विद्यापीठाकडून आकारले जाणारे विविध शुल्क कमी करण्यात यावे. तसेच कोरोना काळात महाविद्यालय व विद्यापीठ बंद होती, तरी विद्यार्थ्यांकडून क्रीडा, जिमरवाना विकास निधी, प्रवेश शुल्क, प्रयोगशाळा शुल्क आकारण्यात आले. ऑनलाइन परीक्षा घेतली असताना भरमसाठ परीक्षा शुल्क आकारले ही बाब विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे.

             तथापि नागपूर विद्यापीठाने शासनाच्या 30 जून 2021 च्या पत्रानुसार विद्यापीठ विभाग व संलग्नित महाविद्यालयांमध्ये आकारल्या जाणाऱ्या शुल्कात सूट देण्यासाठी व्यवस्थापन परिषदेत ठराव केला की, 2021-22 च्या शैक्षणिक सत्रात 50 ते 75 टक्के सूट देण्यात येत आहे.मग नागपूर विद्यापीठाला जे जमते ते स्वा.रा.ती.म. विद्यापीठ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आला का नाही??

नागपूर विद्यापीठ या प्रमाणे आपण विद्यापीठांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा,असे निवेदन मा.राज्यपाल साहेब,मुख्यमंत्री साहेब, शिक्षण मंत्री साहेब,कुलगुरू साहेब, स्वा. रा.ती.म. कुलगुरू साहेब, डॉ.बा.वि.औ.पत्र देऊन विनंती केली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस.स्वप्निल इंगळे पाटील यानी दिली आहे.
No comments:

Post a Comment

Pages