आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीच्या निमंत्रक पदी श्रावण गायकवाड यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 23 August 2021

आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीच्या निमंत्रक पदी श्रावण गायकवाड यांची निवड

औरंगाबाद:

मागील 4 वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील अन्याय अत्याचाराच्या प्रकरणांना वाचा फोडण्यासाठी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीच्या एकमेव निमंत्रक पदी आज श्रावण गायकवाड ह्यांची सर्व सहमतीने निवड करण्यात आले.

आज नंदनवन कॉलनी येथील सम्यक क्रांती बुद्ध विहारात दुपारी 4 वाजता माजी विरोधीपक्ष नेते रावसाहेब गायकवाड ह्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली ह्या बैठकीत माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे ह्यांनी समितीच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी श्रावण गायकवाड ह्यांची निमंत्रक पदी निवड करण्याचा ठराव मांडला त्यास माजी नगरसेवक कृष्णा बनकर ह्यांनी अनुमोदन दिले तर लक्ष्मण गायकवाड,विनोद कोरके,धम्मपाल दांडगे,आनंद कस्तुरे,मेजर विलास पठारे,ऍड.नामदेव सावंत,प्रवीण नितनवरे,अंजन साळवे,डॉ.संदीप जाधव,सतीश पट्टेकर,प्राणतोष वाघमारे,दीपक निकाळजे,मुकेश खोतकर ह्यांनी निवडीचे स्वागत केले.

समितीच्या नावे सर्व पत्रव्यवहार करणे,अन्याय अत्याचाराच्या घटनेचा तपास करून पाठपुरावा करणे,समितीचे सर्व कामकाज त्यांच्या साहिनीशी करण्यात यावे असे एकमुखी निर्णय घेण्यात आले सदर निवड ही 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल,ईतर कुणालाही समितीच्या नावे नियंत्रकाच्या परवानगी शिवाय कुठल्याही प्रकरणी समितीच्या नावाचा वापर करता येणार नाही/करू नये असेही स्पष्ठ करण्यात आले.

तर सचिन निकम,अरविंद कांबळे,गुणरत्न सोनवणे,अतुल कांबळे,राहुल वडमारे,आनंद बोर्डे,सचिन भुईगळ,कपिल बनकर,शैलेंद्र म्हस्के,शुभम हनवते,राहुल जाधव,अविनाश जगधने,राष्ट्रपाल गवई, दीपक डांगरे,अनामी मोरे,विजय बनकर,अमोल भालेराव,साहेबराव पगारे,अविनाश साठे,सम्यक सरपे,मुकुल निकाळजे,किरण सुरडकर,कृष्ण साळवे,केतन शिरसाठ, अनिल जाधव,संतोष शेजवळ,राहुल गायकवाड, कचरू गवळी,स्वप्नील गायकवाड, अविनाश डोंगरे,गुड्डू वाहुळ,प्रबोधन बनसोडे,किरण सुरडकर,राहुल खंडागळे,अनिल साळवे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Pages