लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान - - महेंद्र नरवाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 5 August 2021

लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान - - महेंद्र नरवाडे


      महाराष्ट्रातील  फुले,शाहु आंबेडकर प्रबोधन चळवळीत कवी ,गायक व संगीतकार म्हणून ज्यांनी आपल्या प्रतिभेने समाजाला दिशा देण्याचे काम केले ते प्रबोधनकार  लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पोखरी या गावी झाला.त्यांचे शिक्षण अकरावी पर्यंत झाले.वडील टेलर होते शिवन काम करायचे.कथा व ग्रंथ वाचनकार पारंपारीक भजन गायन करायचे , त्यामुळे प्रभाकर पोखरिकर यांना वाचनाची व गायनाची लहानपणा पासूनच आवड निर्माण झाली.दुष्काळी परिस्थिती मुळे वडील गाव सोडून प्रथम भायखळा , साखळी इस्टेट, तिसरी गल्ली ( जेथे कवी लक्ष्मण राजगुरू राहत होते.) येथे मुंबईला आले.त्यांच्याकडे अनेक महाराष्ट्रातील नामवंत गायक , कलावंत मंडळी येत असत. आंबेडकरी गायनाचा नेहमीच सराव चालत असे.ते ऐकून ही गाण्याची आवड वाढली. नंतर  मावशी पप्पाबाई थोरात , ढोर चाळ , कामातीपुरा , पहिल्या गल्लीच्या बाजूच्या मावशीच्या  दारात वडीलांनी टेलर मशीन चे दुकान टाकले. मुंबईला तेव्हा कव्वालीचे कार्यक्रम रातभर व्हायचे . कव्वालीचे कार्यक्रम ऐकायला जात असत .याठिकाणी  पद्मभूषण पँथर नामदेव ढसाळ राहत असत तेथे कार्यकर्त्यांची बैठक होत असे   स्वतः च घर नसल्यामुळे  नतर ताडदेवला , रेस्कोर्स समोर एक घर विकत घेतले. त्याठिकाणी  शिघ्र कवी गुरुवर्य रमेश खेडकर यांचा सहवास   भीम छाया गायन पार्टी निर्माण केली व तिथूनच गायनाचा प्रवास सुरू झाला.रमेश खेडकर गीत लिहिण्यास सांगायचे आणि लिहिता लिहिता गाणी लिहिण्याची ही सवय चालू झाली.  अनेक गाणी लिहिली . टेलीफोन खात्यात नोकरी केली  परंतु  ज्येष्ठ बंधू जे. आर. दावडिकर  म्हटले तु प्रभावी कवी , वक्ता व शाहीर आहेस समाजाला, आंबेडकरी चळवळीला तुझी गरज आहे .नोकरी करून तू काय मिळवणार आहेस. नोकरी सोडून दे व समाज प्रबोधन कर. भावाने नोकरी सोडायला लावली आणि स्वत: पैसे ही पुरवीले. *महा गायक श्रावनदादा यशवंते*यांच्या मुळे आंबेवाडीत  गीत गाण्याची संधी मिळाली.  "ऐ भीम गौतम , जब तक दुवा है होगी सर पे आपकी , 

हमे डर किसी के बाप की" हे गीत ऐकून श्रावणदादांनी  पाठ थोपटली आणि स्फूर्ती मिळाली. त्यादरम्यान अनेक महाकवी , महागायक कलावंतांचा सहवास लाभला. त्यापैकी  लोकवी वामनदादा कर्डक, श्रावण यशवंते,गोविंद म्हाशिलकर , भीम प्रिय दलितानंद बाबा , शाहीर अप्पा कांबळे, हरेंद्र जाधव ,नवनीत खरे , राजेश जाधव. लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्यामुळे  साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे अलगुज व फकीरा  ही पुस्तके वाचली. त्यादरम्यान चिराग नगर , घाटकोपर या ठिकाणी  कवी रमेश खेडकर यांच्यामुळे अण्णाभाऊ साठेंची भेट ही झाली . त्यांची त्यावेळची परिस्थिती पाहून खूप दुःख ही झाले. खंत व्यक्त केली.  जग बदल घालूनी घाव , सांगून गेले मज भीमराव  हे गाणं त्यांनी लिहिलं.चळवळीसाठी  प्रामाणिकपणा, निस्वार्थ व निष्ठेची गरज असते.तळमळीने काम करण्याची मनोमन इच्छा निर्माण झाली. तेंव्हापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली.दलित पँथरचा तो काळ होता. पँथर चळवळीची क्रांतीकारी गाणी त्यांनी गायली.

१) जीव जाओ अथवा राहो

संयम आता सुटला 

जिथं होईल अत्याचार तिथे जाऊन देई मार 

नाही खाणार हार आजला 

वाऱ्याच्या वेगाने सुटला 

 हा पँथर खवळूनिया उठला 


२) दणकट मनगट पोलादी छाती 

सत्याची मशाल घेऊन हाती 

चाललाय पुढं, खाई दात खड 

वैऱ्याला चाराया माती

खाद्याशी खांदा भिडवून दादा

तयार हे पँथर साथी

ढाले हा राजा ढाले , राजा पँथर चा डौलात चाले  || धृ || 


३) जीवाला जीवाचं दान 

गायक - सोनू निगम , अन्वर जानी 


४)  नाण आंबेडकराचं 

 गायक - आनंद शिंदे , प्रल्हाद शिंदे 

यामधील गाणी खूप गाजली. पँथर नामदेव ढसाळ , राजा ढाले, भाई संगारे , मनोहर अंकुश , रामदास आठवले व समाजाने ही कौतुक केलं. आज ही ती गाणी ऐकल्यावर समाधान मिळते. त्यावेळी कॅसेट चा जमाना होता. अनेक कॅसेट निर्मिती इच्छा पूर्ती केली. मालाड मालवणी हून चेंबूर ला राहायला गेले. प्रिझम , टी - सिरीज यांच्या मुळे खूप सहकार्य झाले. जयभीम नॉन स्टॉप ३६गाणी असलेल्या कॅसेट मध्ये  आनंद शिंदे, मिलिंद शिंदे,कृष्णा शिंदे, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप,भिकाजी भंडारे,नवनीत खरे,किसन खरात,रंजना शिंदे,शकुंतला जाधव, मुकुंद कोकाटे,गौतम धुमाळ, जनार्दन धोतरे, चंद्रभागा गायकवाड   या अनेक नामवंत गायकांनी गाणी गायली. गीत, संगीत आणि संयोजन प्रभाकर पोखरीकर यांचंच आहे असं ते सांगतात.  भीम तो मेरी जान है यात हृदयनाथ सिन्नरकर यांची आठ गीतं आहेत.गायिका निशा भगत, प्रभाकर पोखरीकर, दत्ता खरात, सुरेन्द्र बर्वे यांनी गायलेल्या गीतांला प्रभाकर पोखरीकर यांनीच संगीत दिले. बुद्ध की राह चलो, बौद्ध पुजापाठ,महुका चमन,भीमाईच्या बळाने, भारतरत्न, युगप्रवर्तक,भीम युगंधर, विश्वात नंबर पहिला, जागा हो जागा भीमाच्या वाघा, नानं आंबेडकरांचं, नामविस्तार, रामजी भीमाई नंदना  या कॅसेटमधील अनेक गाण्याला चाली लावल्या, संगीत दिले व स्वतः ही गायली.संचात सुरेश मोरे व बाबुराव शिंदे तबला वाजवायचे.कमलेश जाधव बंजो वाजवायचे शंकर बनसोडे,रवी सरोदे यांच्या साथ संगतीने बुद्ध-भीम गीतांचे अनेक कार्यक्रम केले.व-हाढी,ऐरणी , बंजारा लोकगीते ही लिहली व गायली. प्रख्यात गायक सोनू निगम ने जीवाला जीवाचं दान मधील गाणी गायली. चांगलं गीतकार  म्हणून नाव झालं. चळवळीचं काम करत असताना मिळेल त्यात समाधान मानलं. २८ जानेवारी २०१४ साली रमाबाई नगर , घाटकोपर येथे राहत असताना अटॅक आला. अडीच महिने सायन हॉस्पिटल मध्ये आडमिट असताना साक्षात त्यांना अंत यात्रेची गर्दी पहिली. समाजाने खूप प्रेम दिलं.शेवटच्या श्वासापर्यंत ते विसरू शकत नाही.


"जींदगी मौत का निवाला है

      मौत ने जींदगी को पाला है

       मौत लेने आयी मुझे ए प्रभाकर, मगर उसने भी कह दिया ये तो सच्चा जयभीमवाला है| "

दामोदर हॉल , परेल येथे  सौ. आशाताई सकपाळ व सौ. विद्याताई गायकवाड  यांनी मदतीसाठी कार्यक्रम घेतला.  मा. रमेश कांबळे , मा. मनोज संसारे , आनंद शिंदे, मा. रामदास आठवले साहेब , भारत सरकार , मा. राजाभाऊ शिरसाठ , औंगाबाद व अनेक निष्ठावंत कलावंतांनी   व भीम सैनिकांनी आर्थिक पाठबळ दिलं. त्या सर्वांचा मी शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी राहील , अस ते म्हणाले. चळवळीत काम करत असताना अनेक मान - सन्मान व महाराष्ट्र शासनातर्फे ही  समाजभुषण  पुरस्कार देण्यात आला.त्यामुळे  महाराष्ट्र , देशभर फिरता आले. निर्व्यसनी , निर्मळ , अविवाहित , स्वाभिमानाने जगणं जगता आले. या दरम्यान मालवणी मालाड येथे बहीण सौ. आशाताई शांताराम शिंदे व परिवार यांनी खूप सेवा केली. आता सध्या ठाणे येथे उत्कर्ष अंकुश व शिला अंकुश यांच्या सहवासात ते राहतात. त्यांच्याकडून ही सेवा होत आहे. आता काही तक्रार नाही. यू ट्यूब वर प्रभाकर पोखरीकर हे  चैनल तयार केले होते. या चैनलला दिड कोटी व्हिवजर मिळाले परंतु   त्यात त्यांची फसवणूक झाल्यामुळे  ते बंद झाले. परत दुसरे चैनल सुरू केले . तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे शेअर , कॉमेंट , लाईक आणि सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोहचवा असं त्यांनी अवाहन केलं आहे. 

       लोक कलावंतांची गेले दिड वर्ष कोरोना महामारीमुळे उपासमार होत आहे.समाजाने त्यांची दखल घ्यावी असे ते मदतीसाठी आवाहनही करतात . लोकं त्यांना मदत ही करतात. सध्या त्यांना चालता येत नाही ,कुठे जाता येत नाही. कार्यक्रम ही नाही. जवळ ही काही नाही. आताही आवाज कणखर आहे .लिखाना बरोबर  गीत गाणं संपलेलं नाही ते आजतागायत सुरूच आहे. चेंबूर ला घर आहे पण एस.आर.ए. , म्हाडा मध्ये गेल्याने अपात्र ठरल्यामुळे  सध्या ठाण्याला राहतात. बिल्डरच्या फसवणुकीमुळे भाडे ही नाही व राहण्याची गैरसोय आहे.

     

   मनपसंत गीतं 

१) निर्जीव ह्या जीवांना

जगविण्या भीम आले

बुद्ध तरुला येथे खुलविण्या भीम आले

२)युग पुरुषा महामानवा

   भारतभु नंदना

बुध्दाला,धम्माला संघाला भीमाला

करुया वंदना

३)छाती ठोक हे सांगु जगाला

असा विद्वान होणार नाही

४)हे पाणी आनीले मी 

माठ भरुनी

घोटभर जाहो पिऊनी

५)बेधडक तु दे धडक

आडवा आला खुशाल त्याला

बेलाशक तु सडक सडक

६)शिलवान भारी गुणवान

 विद्यापती तिचा धनवान

नटवीला सोन्यानं गं

संसार भीमाचा रमानं

त्यांचा शेर 

  मेरे मन मे भीम मेरे तन मे भीम

आओ जयभीम वालों मै मर मीट जांऊ, तो मेरे कफन पे लिख देना

जयभीम जयभीम.


संदेश 

   प्रबोधनकार शाहीर प्रभाकर पोखरीकर बहुजन समाजाला संदेश देतात की या देशाला अखंडीत ठेवायचं असेल ते संविधानाने च ठेवता येईल . भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे.तथागताचा धम्म व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हेच  आपणास तारु शकेल.त्यासाठी भीम निष्ठा अंगीकारुन  बुद्ध विचाराचे अनुसरून करावे.देशालाच नाही तर जगाला बूद्धाच्या मानवतावादी व विज्ञानवादी धम्माची गरज आहे.प्रतिभावंत शाहीर प्रभाकर यांच्या धारदार लेखनीला मानाचा जयभीम.

   


        - महेंद्र नरवाडे,किनवट.(नांदेड)

            मो.न.७०६६६५०३६६.

No comments:

Post a Comment

Pages