गीते वामनांची अभिवादन कार्यक्रम संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 19 August 2021

गीते वामनांची अभिवादन कार्यक्रम संपन्न

किनवट,दि.१९ : देशभक्ती, हुंडाबंदी, पर्यावरण ,चित्रपट गीते ,प्रेमगीते व लोकगीते यासह परिवर्तनवादी महामानवावर अकरा हजाराहून अधिक गीते लिहिलेल्या महाकवी वामनदादा कर्डक यांची९९ वी जयंती आदीजण संस्था संचलित वामनदादा कर्डक संगीत अकादमी राजश्री शाहूनगर, गोकुंदा(ता. किनवट) येथील संचालक सुरेश पाटील यांच्या नागसेनवन निवास येथे "गीते वामनांची", ह्या शास्त्रीय संगीताच्या  मैफिल अविष्काराने नुकतीच संपन्न झाली. 

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्राट अशोक बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष भारत कावळे हे तर,प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर शिंदे प्रा. डॉ. पंजाब शेरे ,अशोक सरपे, बंडू भाटशंकर, उपस्थित होते. उद्घघाटन डॉ. मनोहर शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी शब्दांजली शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत सुषमा पाटील.व सुरेश पाटील यांनी केले .बौद्धाचार्य अनिल उमरे व महेंद्र नरवाडे यांनी वंदना घेतली. 

        पुरियाधनाश्री  रागातील करिते पूजा मी या वामनदादाच्या वंदन  गितांनी आम्रपाली वाठोरे(संगितविशारद )यांनी लयबद्ध  प्रारंभ करून कामराज माडपेलीवार यांच्या साथीने मेरा कर्मा तू देशभक्ती गीत व कोरोना युगल गीत सादर केले. प्रज्ञाचक्षू गायक प्रदीप नरवाडे यांनी मिश्र रागातील एकीने वार करा रे, माय बापा हुन भिमाचे व वामन दादाची वादळ वारा ही रचना गाऊन प्रचंड टाळ्या मिळविल्या. 

        सुरेश पाटील यांनी विभास रागातील समाजाचं काय? वामनदादांचं संदेश गीत सादर केले .कामराज माडपेलीवार यांनी  ऐ वतन ऐ वतन देशभक्ती गीत, रुपेश मुनेश्वर यांनी जगातली देखणी बाई मी भिमाची लेखणी वामनदादा ची रचना आलाप ताना घेत गायली. पुणे येथील प्रकाश सोनवणे यांनी चांदण्याची छाया, रेखा सोनवणे( पुणे) यांनी शाळेत मला का दूर बसवले जाई हे भावना प्रधान गीत गायले. युवा गायक भीमराव पाटील यांनी उद्धरली कोटी कुळे तर बालाजी वाढवे यांनी बोधी गयेचा शीतल वारा गाऊन रसिकांना खिळवून ठेवले. 

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे तर आभार सुषमा पाटील यांनी मानले. संगीताची साथसंगत  योगिनी प्रकाश सोनवणे, सिंथेसायझर प्रदीप नरवाडे, तबला सूरजकुमार पाटील, ढोलक व्यंकट मुंडावरे, साहेबराव वाढवे यांनी केली. ध्वनीव्यवस्था राष्ट्रगीत कयापाक यांनी केली.याप्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर डॉ. शामराव राठोड मारोतराव सूर्यवंशी(वनविभाग) आकाश मोरेवार ,विवेक कांबळे, सुजित नगारे, सुनील कांबळे, स्मिता कानिंदे ,सुवर्णा मुनेश्वर, निवेदक कानिंदे,अभिधम्म पाटील ,प्राजक्ता कांबळे यासह अनेक संगीत रसिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages