अफगणातील तालिबानी स्थिती आणि भारतीय.... - जी. संदीप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 19 August 2021

अफगणातील तालिबानी स्थिती आणि भारतीय.... - जी. संदीप


        मागील काही दिवस झाले जगात सर्वात जास्त चर्चिला गेलेला मुद्दा म्हणाजे अफगाणिस्तान आणि तालिबान. तालिबान्यांनी अफगाणिस्तान ची सत्ता काबीज केली आणि हिंसाचाराचे स्तोम माजले. त्यामुळं नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. पण हे सर्व एकदाच झालं का हो ? तर या प्रश्नांचे उत्तर नाही असच येईल. मग हे एकदाच झालं नाही तर हे घडत असताना तिथली शासन व्यवस्था काय झोप्या काढत होती का ? शेजारील देशांना मदत मागता नाही आली का ? अमेरिकेचे सैन्य काही वर्ष तिथे होतेच ना. मग अमेरिकेने सैन्य मागे घेताच हा प्रवास सुरू झाला असेल तर मग अमेरिकेने सैन्य माघार घेतले म्हणजे हा एक डावपेच तर नव्हे ना ? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात ज्यांना आम्ही महत्व देत नाही.

          आम्ही महत्व देतोय आमच्या देशातील व्यवस्थेला, देशातील व्यवस्थेला महत्व देत असताना भारतीयांची मानसिकता त्यांच्या त्यांच्या आदर्शानुसार बनली आहे. भारतीय संविधान निर्माणासाठी महत्वाचा वाटा असलेल्या आंबेडकर अनुयायांचा एक वर्ग, छत्रपती शिवरायांना आदर्श मानणारा एक वर्ग आणि तिसरा वर्ग या दोन्ही व्यतिरिक्त जो प्रधानमंत्री या पदावर असलेल्या व्यक्तीला महत्व देणारा वर्ग. या तिन्ही वर्गाच्या माध्यमातून अफगाणिस्तान सारखी स्थिती भारतात निर्माण न होण्याला ते घटक कसे कारणीभूत आहेत याच विवेचन केलं जातं आहे. पण पहील्या दोन वार्गापैकी कोणताही वर्ग त्या व्यक्तीचं देशातील महत्व सांगत असताना वर्तमानात त्यांचा कोणताही आदर्श घेऊन वागत नाही.फक्त त्यांचे नाव घेतले जातात बास्स एवढंच काय तो अभिमान. त्यांच्या वास्तव कार्यप्रणालीच्या अमलबजावणीसाठी कोणी प्रयत्न करत नाही. तिसरा वर्ग हा प्रधान मंत्र्याच्या कार्यप्रणालीवर अभिमानाने गौरवोद्गार काढतोय. आज जे प्रधानमंत्री आहेत ते  प्रधानमंत्री जर नसते देशाचं वाटोळं झालं असत. जस काही शेजारील इतर देशांच वाटोळच झालं आहे.

             या वेग - वेगळ्या जातीअभिमानी वार्गांचा विचार केला तर ते त्यांच्या जागी बरोबर आहेत अस गृहीत धरू. तसे असेल तर मग भविष्याच्या बाबतीत सद्य स्थीतीतील नागरिकांची भूमिका काय ? याबद्दल कोणताही नागरिक काही उत्तर देणार नाही. ती परिस्थिती जी निर्माण झाली आहे ती धर्माच्या अभिमानातूनच, मग आपण जे देशातील स्थिती चांगली आहे त्याला कारण शिवरायांची कार्यप्रणाली व बाबासाहेबांची कार्यप्रणाली कारणीभूत आहे असं म्हणतोय ते सुद्धा एका जातीच्या चष्म्यातून पाहूनच म्हणतोय ना. मराठा समाजाच्या व्यतिरिक्त ईतर समाज शिवरायांच्या कार्याबद्दल असा उल्लेख करताना दिसत नाही आणि बौध्द समाजाव्यातिरिक्त इतर समाज बाबासाहेबांच्या नावाचा गौरव करताना दिसत नाही.(काही बोटावर मोजण्याइतके अपवाद असतील) त्यांचं कार्य हे उल्लेखनीय आहेच पण त्यांनी कधी त्यांच्या कार्याचा आधार घेऊन जाती - जातीत भेद वाढावेत असं कार्य केलंय का ? मग हा असा जातीच्या व्यक्तींनी त्यांचं नाव घेऊन अभिमान मिरवणे हे घातक नव्हे का ? हे धर्मांधत्व नव्हे का ?

           मग कोणत्या तोंडाने स्वतःच्या देशातील स्थितीचा गुण गौरव करताय ? देशात धर्माच्या नावाने भांडत बसताय पण विकासाच्या नावाचं काय ? देशातील प्रत्येक नागरिकांचा विकास म्हणाजे देशाचा खरा विकास होय. जातीधर्माच्या नावाने देशभक्तीच्या नावाने भांडणे केल्याने देशाचा विकास होत नसतो हे आमच्या लक्षात येत नाही. चालले देशभक्तीच्या गप्पा मारायला आणि दुसऱ्याला देशभक्तीचे अमृत पाजायला.

         - जी. संदीप

No comments:

Post a Comment

Pages