आंबेडकरी विद्यार्थी संघटनांकडून नामांतर शहिदांना अभिवादन ; नामांतर शहीद स्मारकाचे काम गतिमान करा आंबेडकरी विद्यार्थी संघटनांची कुलगुरूंकडे मागणी. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 4 August 2021

आंबेडकरी विद्यार्थी संघटनांकडून नामांतर शहिदांना अभिवादन ; नामांतर शहीद स्मारकाचे काम गतिमान करा आंबेडकरी विद्यार्थी संघटनांची कुलगुरूंकडे मागणी.

औरंगाबाद : 

आज दि ४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी जातीयवाद्यांच्या हल्ल्यात नांदेड येथे दि ०४ ऑगस्ट १९७८ रोजी  हुतात्मा झालेले शहिद  पोचिराम कांबळे,जनार्धन मवाडे यांना विद्यापीठाच्या कामानीलगतच्या शाहिद स्तंभावर अभिवादन करण्यात आले .

नामांतर शाहीदांचे स्मारक उभारण्याची मागणी प्रलंबित असल्याने नामांतर शहिदांच्या स्मारकासाठी विद्यापीठाच्या मध्यवर्ती भागातील जागा निश्चित करून किमान 10 कोटी रुपयांची आर्थीक तरतूद करण्यात यावी व स्मारक उभारण्याची प्रक्रिया गतिमान करावी,व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांच्या गठीत केलेल्या समितीत प्रत्यक्ष वृत्तांकन करणारे जेष्ठ पत्रकार,नामांतर लढ्यातील प्रत्यक्ष सहभागी व विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी ह्यांचा समावेश करावा,दि.१४ जानेवारी २०२२ रोजी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात यावे,नामांतर शहिद स्मारकाचे स्वरूप कसे असावे ह्या साठी सूचना मागविण्यात याव्या, नामांतर लढ्यातील शहिदांच्या वारसाला शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यापीठाच्या सेवेत सामावून घ्यावे ह्या मागण्याचे निवेदन प्र. कुलगुरू डॉ. शाम शिरसाठ ह्यांना देण्यात आले.


मागील अनेक वर्षांपासून सदरील मागणी प्रलंबित असून घोषणा करण्यापलीकडे विद्यापीठ ह्या बाबतीत फार गंभीर नसल्याने आंबेडकरी अनुयायांत रोष असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

ह्यावेळी रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम,पँथर्स विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे,डॉ.अविनाश सोनवणे,प्रा.मोहन सौंदर्य,प्रा.प्रबोधन बनसोडे,ऍड.अतुल कांबळे, विकास रोडे,सम्यक सरपे,अक्षय जाधव,सम्यक चे अमोल घुगे,तुषार अवचार,अनिल दिपके,सागर गवई,अविनाश सावंत आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages