तालीबानी आणि मनुवादी जुळे भाऊ...!! -. भास्कर भोजने - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 18 August 2021

तालीबानी आणि मनुवादी जुळे भाऊ...!! -. भास्कर भोजने

           धार्मिक कट्टरवादी तालीबानी कसे धर्माच्या नावाखाली इतरांचे स्वतंत्र  हक्क आणि अधिकारावर गदा आणतं आपलं म्हणणं किंवा धार्मिक कायदा जनतेवर लादतं आहेत त्याचे चर्वितचर्वण भारतीय मिडिया मध्ये गेल्या दोन दिवसापासून जोरा शोरात सुरू आहे...!! 


   इस्लामच्या नावाखाली, शरीयतच्या नावाखाली कसे महिलांना गुलाम बनविले जाते आहे, त्यांच्या इच्छा,आशा,आकांक्षाचा कसा चुराडा केला जातो आहे याचाही पाढा मोठ्या आवाजात वाचल्या जातं आहे...!! 


   भारतीय मिडिया खूप पुढारलेला आहे, मानवतावादी दृष्टिकोन घेऊन सुधारणावादी विचार पेरणारा आहे अशी भलावण केली जाते आहे प्रत्यक्षात  काय चित्र आहे...??? 


धार्मिक कट्टरवाद हा मानवी स्वातंत्र्याची गळचेपी करतो हा मानवतावादी सिद्धांत मानववंश शास्त्रज्ञांनी मांडला आणि म्हणूनच मग मानवतावादी राज्य शासन पद्धती बद्दल जगात प्रयोग सुरू झाले...!! 


 भारतीय मिडिया इस्लाम मधील कट्टरवादाला कडाडून विरोध करतो, ख्रिस्ती कट्टरवादाचा सुद्धा विरोध करतो मात्र हिंदू कट्टरवादाला विरोध करतो काय..?? 


 वरील प्रश्नांचे उत्तर नकारार्थी आहे, त्याचे उत्तर आहे, 

"आपलं ठेवायच झाकून आणि इतरांचे बघावे वाकून" ...!! 


  हा जो ढोंगी पणा आहे तो भारतीय जनमानसाने समजून घेतला पाहिजे..!! 


   अफगाणिस्तान मध्ये तालीबानी राजवट आली तर अफगाणिस्तान मधील जनजीवन २०० वर्षे मागे मध्ययुगीन कालखंडात जाईल अशी भीती भारतीय मिडिया मधील सुज्ञ विचारवंत(?)बोलून दाखवितं आहेत, अफगाणिस्तान मधील स्त्री गुलाम होणार आहे,हाच न्याय भारतीय मिडिया हिंदू कट्टरवादासाठी वापरुन भारतीय जनतेचे प्रबोधन का करीत नाही...??? 


  भारतीय धार्मिक कट्टरवादाने ऐतिहासिक वास्तू बाबरी उध्वस्त केली, त्याच्यावर कडी म्हणून कोर्टाला आस्थेच्या नावाखाली निर्णय द्यायला भाग पाडून इतिहासाची मोडतोड केली आणि धार्मिक कट्टरवादाने इथल्या निरपराध दोन्ही धर्मातील लाखो लोकांचे बळी घेतले त्याबाबत भारतीय मिडियाची काय भूमिका होती, हाताची घडी तोंडावर बोट...!! 


   २००३ साली भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारने भविष्य विद्या हे शास्त्र आहे  त्याला विद्यापिठ स्तरावर अभ्यासक्रम म्हणून लागू करावा  हा अतिशय चुकीचा भारतीय जनतेला अंधश्रद्धेच्या खाईत लोटणारा निर्णय घेतला त्या निर्णयामुळे देश २०० वर्षे मागे मध्ययुगीन काळात गेला त्या बाबत भारतीय मिडियाची काय प्रतिक्रिया होती...??? 

 भारतीय मिडियाने त्याचा विरोध केला नाही ऊलट भारतीय इलेक्ट्रॉनिक मिडियाने नवे चॅनेल उघडून भविष्य विद्येचा धंदा सुरू केला...!! 


   संसदेत कुठलीच चर्चा न करता शेतकऱ्यांना गुलाम बनविणारे तीन तीन कायदे तयार करुन भांडवलदारांची गुलामी इथल्या शेतकऱ्यांवर लादल्या जातं आहे, त्या गुलामी विरूद्ध गेल्या नऊ महिन्यापासून शेतकरी राजधानीच्या रस्त्यावर बसला आहे, या गुलामी विरुद्ध भारतीय मिडियाची काय भूमिका आहे...??? 

 सरकारच्या मनुवादी भुमिकेचा भारतीय मिडियाने विरोध केला नाही ऊलट आंदोलन करणा-या शेतकऱ्याला खलिस्तानी म्हणून शिवी दिली...!! 


  आपल्या देशात मनुवादी ऊघडं ऊघडं धर्माच्या नावाखाली नंगानाच करीत आहेत, मॉबलिचिंग, विद्यापिठातील विद्यार्थ्यांना अमानुष मारझोड, रोहित वेमुला सारख्या स्कॉलरला आत्महत्या करावी लागली एवढी दहशत, ऊना कांड, राज्य सभेत महिला खासदारांना मारपीट, पेगासस जासुसी अशाप्रकारच्या घटना दररोज घडतं आहेत, त्याबाबत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश टिपण्णी करीत आहेत तरीही भारतीय मिडियाची कुंभकर्णी झोप ऊघडतं नाही...?? 


  तालीबानी कट्टरवादासाठी भारतीय मिडियाला जसे ज्ञान प्राप्त होते आणि त्या कट्टरवादाचे दुष्परिणाम दिसतात तसेच भारतीय हिंदू कट्टरवादासाठी भारतीय मिडियाने आपलं बौद्धिक कसब पणाला लावले पाहिजे अशी भारतीय जनता अपेक्षा करते आहे...!! 


 कट्टरवाद हा कट्टरवाद असतो तो इस्लाम मधील असो, ख्रिस्ती असो वा हिंदू असो हा न्यायीभाव भारतीय प्रसारमाध्यमांनी बाळगावा नाहीतर इंग्रजांनी मद्रास कार्टात न्यायाधिश नेमणूकी बाबत एक टिप्पणी करुन ठेवली होती की, भारतातील ब्राह्मण वर्गात न्यायीक चारित्र्य नाही त्याचा अनुभव देश घेत आहेच...!! 

  जयभीम. 

            - भास्कर भोजने.

No comments:

Post a Comment

Pages