औरंगाबाद : कुठल्याही फळाची अपेक्षा न करता बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा गीतांच्या माध्यमातून प्रचार प्रसार करून लोकांचे आत्मभान जागविणारे वामनदादा कर्डकांच्या जीवनातून आंबेडकरी कार्यकर्त्यांनी निष्ठेचा बोध घ्यावा वामनदादांच्या गीतांमध्ये आंबेडकरी विचारांची नवी पिढी घडविण्याची प्रचंड ऊर्जा आहे ह्या गीतांचा योग्य अर्थ समजून घेतल्यास कार्यकर्त्यांना निश्चितच दिशा मिळू शकते असा विश्वास श्रावनदादा गायकवाड ह्यांनी व्यक्त केला.
मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेयर असोसिएशनच्या वतीने विद्यापीठ गेट येथे महाकवी वामनदादा कर्डक ह्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले त्यावेळी श्रावनदादा गायकवाड बोलत होते.
अजय देहाडे ह्यांनी अभिवादन पर गीत सादर केले.
ह्यावेळी आनंद कस्तुरे,दिपक निकाळजे,सचिन निकम,प्राणतोष वाघमारे,मिलिंद बनसोडे,संदीप जाधव,रमेश वाघ,अॅड.अतुल कांबळे,अॅड.हेमंत मोरे,गायक अजय देहाडे,गुणरत्न सोनवणे,पवन साळवे,निखिल बोर्डे,शैलेंद्र म्हस्के,अॅड.तुषार अवचार,विकास रोडे,सुशील दिवेकर,धम्मा बनसोडे,भूषणखोडके,विजय पवार,रोहित नरवडे व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment