नांदेड, ता.१६ : १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन.नुसताच स्वातंत्र्य दिन नाहीतर सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्य दिन. याबरोबरच किनवट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांचाही वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्य दिनानिमित्त किनवट विधानसभा मतदार संघातील किनवट व माहूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी जागतिक कोरोना महामारीचा काळ असूनही या परिस्थितीकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत संपूर्ण किनवट विधानसभा मतदार संघात जागोजागी हजारो रुपये खर्चुन शेकडो बेनर (फ्लेक्स) लावलेत. लावले तर लावले,परंतु, या फ्लेक्स मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारा मजकुर १ टक्के ,तर आमदाराला शुभेच्छा देणारा मजकुर ९९ टक्के ठेवला.हा मजकुर वाचून एका जाग्रत नागरिकाच्या तोंडातून प्रतिक्रिया निघाली की,"स्वातंत्र्य दिन झाला छोटा, वाढदिवस झाला मोठा."
अलिकडच्या काही दिवसात कोरोना महामारीचे व डेल्टा प्लस संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऐकमेकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, नांदेडचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलिकर,नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले होते.याच धर्तीवर किनवट विधानसभेच्या लोकप्रतिनिधी ने आपला वाढदिवस रद्द करणे जरुरीचे होते.परंतु, तसे त्यांनी केले नाही.
देशभक्तीचा ठेका घेतल्याचे सांगणा-या व केंद्रात सत्तास्थानी असलेल्या भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी किनवट विधानसभा मतदार संघात आहे.वाढदिवसाची शुभेच्छा देणारे व स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा देणारे दोन स्वतंत्र बेनर लावण्याऐवजी एकाच दगडात दोन.पक्षी मारण्याच्या नादात कंत्राटदारांनी लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाच्या व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्याच्या नादात बेनरवर लोकप्रतिनिधीला शुभेच्छा देणारा मजकूर ९९ टक्के, तर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारा मजकुर १ टक्के ठेवून सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्य दिन महोत्सव छोटा केला व वाढदिवस मोठा केला. यावरुन वाढदिवसाच्या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाची ऐशी की तैशी केल्याचे काम बेनरच्या (फ्लेक्स) माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचे मतदार संघातील नागरिकांना उघड्या डोळ्यांनी पाहीले आहे.
दरम्यान,जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करावेत,या मताचे लोकप्रतिनिधी होते.परंतु, त्यांच्या अवतीभवती वलयांकित असणा-या कांही कंत्राटदारानी अर्थपुर्ण व्यवहारातून लोकप्रतिनिधीचा वाढदिवस जंगी व धुमधडाक्यात साजरा करून जवळपास १५ते २०लाख रुपयांचा चुराडा केला. याबाबत लोकप्रतिनिधीचे काहीऐक चालु दिले नाही.भारताचा सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्य दिन असल्यामुळे या दिवशी देशप्रेमात अखंड न्हावून निघायचे सोडून भाजप कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधीच्या अंधभक्तीत अखंड बुडवून घेतले होते .या प्रकारामुळे आपण नाराज असल्याचे भाजपशी एकनिष्ठ असलेल्या अनेक कार्यकर्त्यांंनी बोलून दाखविले. वाढदिवसाच्या कार्यक्रमावर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याऐवजी त्याच रक्कमेतून कोरोना महामारीच्या काळात गरजवंताला अन्न-धान्य किटची मदत केली असती तर वाढदिवसाची नोंद आदिवासी तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवली असती,असे मतही पक्षासाठी एकनिष्ठ असणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment