स्वातंत्र्य दिन झाला छोटा ,वाढदिवस झाला मोठा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 15 August 2021

स्वातंत्र्य दिन झाला छोटा ,वाढदिवस झाला मोठा


किनवट, ता.१४ : १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन.नुसताच स्वातंत्र्य दिन नाहीतर सुवर्ण अम्रतमहोत्सी स्वातंत्र्य दिन. याबरोबरच किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांचाही वाढदिवस. आमदार केराम यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्य दिनानिमित्त किनवट विधानसभा मतदार संघातील किनवट व माहूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी जागतिक कोरोना महामारीचा काळ असूनही या परिस्थितीकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत संपूर्ण किनवट विधानसभा मतदार संघात जागोजागी हजारो रुपये खर्चुन शेकडो  बेनर (फ्लेक्स) लावलेत. लावले तर लावले,परंतु, या फ्लेक्स मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारा मजकुर १ टक्के ,तर आमदाराला शुभेच्छा देणारा मजकुर ९९ टक्के आहे.हा मजकुर वाचून एका जाग्रत नागरिकाच्या तोंडातून प्रतिक्रिया निघाली की,"स्वातंत्र्य दिन झाला छोटा, वाढदिवस झाला मोठा."

   अलिकडच्या काही दिवसात कोरोना महामारीचे व डेल्टा प्लस संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऐकमेकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, नांदेडचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलिकर,नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले होते.याच धर्तीवर किनवट विधानसभेच्या लोकप्रतिनिधी ने आपला वाढदिवस रद्द करणे जरुरीचे होते.परंतु, तसे केले नाही.

 

   देशभक्तीचा ठेका घेतल्याचे सांगणा-या व केंद्रात सत्तास्थानी असलेल्या भारतीय जनता पार्टीचा आमदार किनवट विधानसभा मतदार संघात आहे.परंतु, वाढदिवसाच्या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाची ऐशी की तैशी केल्याचे काम बेनरच्या  (फ्लेक्स) माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचे मतदार संघातील नागरिकांना उघड्या डोळ्यांनी पाहीले आहे.

    दरम्यान,जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करावेत,या मताचे आमदार होते.परंतु, त्यांच्या अवतीभवती वलयांकित असणा-या कांही कंत्राटदारानी अर्थपुर्ण व्यवहारातून लोकप्रतिनिधीचा वाढदिवस जंगी व धुमधडाक्यात साजरा केला. याबाबत लोकप्रतिनिधीचे  काहीऐक चालु दिले नाही.  आज भारताचा अम्रतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन असल्यामुळे आजच्या दिवशी देशप्रेमात अखंड न्हावून निघायचे सोडून भाजप कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधीच्या अंधभक्तीत अखंड बुडवून घेतले होते .या प्रकारामुळे आपण नाराज असल्याचे भाजपशी एकनिष्ठ असलेल्या अनेक कार्यकर्त्यांंनी बोलून दाखविले.


No comments:

Post a Comment

Pages