किनवट येथील लोकअदालतीत १५६ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 25 September 2021

किनवट येथील लोकअदालतीत १५६ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाले

किनवट  : तालुका विधीसेवा प्राधिकरण व वकील संघाच्या वतीने शनिवारी (ता.२५)  किनवट न्यायालयात आयोजिलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेले ३ दिवाणी ,१४ फौजदारी खटले व विविध बँकेचे १३९ दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण १५६  प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली आहेत. किनवट,मांडवी,उमरी,बोधडी,इस्लापुर येथील विविध बँकेच्या दाखलपूर्व १३९ प्रकरणामध्ये एकूण ६९ लाख ६९ हजार ९४६ रुपयांच्या रकमेवर तडजोड झाली. अनेक प्रकरणे  निकाली निघाल्याने न्यायालयावरील कामाचा ताणही कमी झाला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.आजच्या लोकअदालतीत इरफाना  व शाहरूख शेख यांचा विस्कटलेला संसार जुळविण्यात आला या जोडीचा किनवट वकील संघाच्या वतीने साडीचोळी व पुष्प हार देऊन सत्कार करण्यात आला


     कोरोना नियमांचे पालन करून किनवट येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.  यासाठी दोन पॅनल करण्यात येऊन एका पॅनलचे प्रमुख म्हणून विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधिश एस.बी. अंभोरे तर पॅनल सदस्य म्हणून अ‍ॅड.राहुल सोनकांबळे व के. मूर्ती यांनी काम पाहिले. दुसर्‍या पॅनलवर प्रमुख म्हणून सह.दिवाणी न्यायाधिश व्ही.जी. परवरे आणि सदस्य म्हणून अ‍ॅड.दिव्या पाटील व प्रा.डॉ. सुनील व्यवहारे यांनी काम पाहिले.                                    यावेळी अ‍ॅड.अनंत वैद्य, अ‍ॅड.शंकर राठोड, अ‍ॅड.अरविंद चव्हाण,    ऍड के जी काझी,ऍड यु बी चव्हाण,ऍड दिलीप काळे,अ‍ॅड.आकाश कोमरवार, अ‍ॅड. पंजाब गावंडे, अ‍ॅड.सुनील शिरपुरे, अ‍ॅड.उदय चव्हाण,ऍड जी एस रायबोळे, ऍड दिलीप कोत्तावार,अ‍ॅड.टी एच कुरेशी,ऍड एस एन नेमानिवार, ऍड मिलिंद सर्पे, अ‍ॅड. एन यु मुनेश्वर, अ‍ॅड. टी.आर. चव्हाण, अ‍ॅड के के मुनेश्वर, अ‍ॅड.एस एस ताजने, अ‍ॅड. आकाश कोमेरवार,अ‍ॅड.के.एस.काजी,ऍड पी पी गावंडे, ऍड रुपेश पुरुषोत्तमवार,स्टेट बँक ऑफ इंडिया चे भूषण वेताळ,     अनुराग भसमे, निती,संतोष चौधरी, संतोष मेश्राम, विनोद झोडे, संतोष ताडपेल्लीवार, नितिन वानखेडे, पंखुडी शिंदे,शैलेश आढाव,सुब्रत बेहरा,महाराष्ट्र ग्रामीण बँक चे रुपेश दलाल, अमोल चांदेकर, उपदेश मेश्राम व राहुल बंडूळे या विविध बँकेच्या अधिकार्‍यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वितेसाठी वर्षा बोलेनवार, एल.वाय. मिसलवार, बी ए घुले, एस एम चिटमलवार, जी.डी. सोनटक्के,शाम कुलकर्णी,अ मुझिब, ए एस  धोटे, शेख मगदुम, आर एस माने, केंद्रे, नीलवर्ण, कावळे, बारसे, सूर्यवंशी, के.व्ही. आडे, शेख बाबू, तेलंग, शेख शौकत, गौतम जोंधळे,  या  न्यायालयीन कर्मचार्‍यांनी पोलीस विभागाचे सहायक निरीक्षक वाठोरे,नबाब पठाण,सुभाष दोनकलवार ,शिवनंदा रायलवार व पवार परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages