प्रभाग पद्धती विरोधात रिपब्लिकन सेनेची निदर्शने ; प्रभाग पद्धती रद्द करून 1सदस्यीय पद्धत लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 28 September 2021

प्रभाग पद्धती विरोधात रिपब्लिकन सेनेची निदर्शने ; प्रभाग पद्धती रद्द करून 1सदस्यीय पद्धत लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन


औरंगाबाद दि. २८ महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महानगरपालिका/नगरपालिका निवडणुकीसाठी 3 वार्ड मिळून एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय संविधानाने दिलेल्या प्रतिनिधीत्वाचा अधिकार डावलणारा असल्याने हा निर्णय तात्काळ रद्द करून 1 सदस्यीय पद्धतीने निवडणूका घ्याव्यात ह्या मागणी करीता दुपारी 1 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.


विभागीय उपायुक्त मणियार ह्यांनी निवेदन स्वीकारले.


ह्यावेळी मुख्यमंत्री महोदय हे केवळ मुंबई चे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत असून उर्वरित महाराष्ट्राला त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे प्रभाग पद्धतीने छोट्या पक्ष, संघटना ह्यांच्या माध्यमातून प्रामाणिक पणे जनसेवा करणाऱ्यांसाठी सत्तेची दारे बंद होतील,अपक्ष उमेदवार,कमकुवत आर्थिक स्थिती असणाऱ्यांना संविधानाने बहाल केलेला प्रतिनिधित्वाच्या अधिकाराचे हणन होणार आहे,बहुसंख्य वर्गाच्या फायद्यासाठी दलित बहुजन अल्पसंख्याक समाजावर ह्यामुळे अन्याय होणार असल्याने सरकारने तातडीने निर्णय बदलावा असा उल्लेख निवेदनात केला आहे.

आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत रुपेकर,संघटक आनंद कस्तुरे,रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम,जिल्हाध्यक्ष प्रा.सिद्धोधन मोरे,मिलिंद बनसोडे ह्यांनी केले.


धम्मपाल भुजबळ,गणेश रगड़े,विकास हिवराळे, विलास गायकवाड,सचिन शिंगाडे,नंदू मनोहर,आनंद भिसे,अशोक दानेकर,सचिन गायकवाड,राघव हिवराळे,अतिष रुपेकरशेषराव दाणे,ऍड.अतुल कांबळे, तुषार अवचार,सम्यक सरपे,अशोक मगरे,शैलेंद्र म्हस्के,दिनेश गवळे,प्रवीण हिवराळे,कुणाल भालेराव आदींसह रिपब्लिकन कामगार सेना व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages