मुंबईतून संसाराचा गाडा गावाकडे हलवण्याचा विचार करून आम्ही सामानाची बांधाबाद सुरू केली. तेवढ्यात मा. राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे साहेबांचे खासगी सचिव श्री. राजेंद्रकुमार पाटील साहेब यांचा फोन आला. 'मंत्री महोदय कार्यालयात उपस्थित आहेत, भेटायला येवू शकता!', असे सचिवांनी सांगितले. हातातलं काम टाकून मंत्री महोदयांना भेटण्यासाठी निघालो. दीड तास प्रवास करून अखेर विधानभवनात पोहोचलो. पोहचायला उशीर झाला होता, मंत्री महोदय भेटतील की नाही? अशी धाकधूक मनात सुरू होती. कार्यालयात पोहचताचं मंत्री महोदय उपस्थित असल्याचे पाहून सुटकेचा निःश्वास सोडला. मंत्री महोदयांना भेटण्यासाठी नागरिकांची रांगचं रांग लागली होती. मी भेटण्याची प्रतिक्षा करत होतो. तेवढ्यात 'जनता दरबार' कार्यक्रमाची वेळ झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून ‘जनता दरबार’ भरवला जातो. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवल्या जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जनता दरबारला नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात दर मंगळवारी दुपारी २ ते ४ या वेळेत राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे साहेबांचा जनता दरबार भरतो, जनता दरबार विषयी खूप ऐकल होतं. आता प्रत्यक्ष पाहण्यासाठी संधी मिळणार होती म्हणून उत्सुकता शिगेला पोहचली होती. टॅक्सीने राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय गाठलं. कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी ओसंडून वाहत होती, त्यातून वाट काढत आत पोहचलो. शारिरीक अंतराचे नियम पाळून नागरिक एका लाईनमध्ये उभे होते. मंत्री महोदय एका- एकाने सर्वांच्या समस्या जाणून घेत होते.
बीड जिल्ह्यातील तरुणाईचं शिष्टमंडळ मंत्री महोदयांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या अडचणी मंत्री महोदयांनी जाणून घेतल्या आणि तात्काळ महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना फोन लावला. ‘हॉलो, मी प्राजक्त तनपुरे बोलतोय, कोणतीही पुर्व सुचना न देता तुम्ही ६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलत. काय आहे कारण? त्या कर्मचाऱ्यांना ४ महिन्यापासून वेतन मिळाले नाही, काय खायचं त्यांच्या कुटुंबांनी ? कसा चालणार त्यांच्या कुटुंबाचा गाडा ? सांगा?’ अधिकारी गप्प होते.
अधिकाऱ्यांनी केलेली घोड चुक त्यांच्या लक्षात आली असावी, त्यामुळे मंत्री महोदयांना काय उत्तर द्यावे हे अधिकाऱ्यांना सुचत नव्हते. ‘त्यांचे शिल्लक राहिलेले वेतन तात्काळ देवून टाका! ते कर्मचारी ३ वर्षापासून महावितरणमध्ये काम करत होते, त्यांना कामाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा उपयोग महावितरणला होऊ शकतो. त्यांना कामावर पुन्हा रुजू करा आणि काय कार्यवाही केली मला कळवा’ अशा स्पष्ट शब्दात मंत्री महोदयांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला. हे सर्व ऐकुण माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. मंत्री महोदयांच्या कामाची पद्धत पाहून मी आवाक झालो. एखादी समस्या समजून घेवून की तात्काळ कशी सोडवायची याचे उत्तम उदाहण मी प्रत्यक्षात पाहत होतो. मंत्रालयात काही वर्ष काम केल्यामुळे विविध पक्षाचे मंत्री यापुर्वीही पाहीले होते मात्र, तात्काळ जनतेचे प्रश्न सोडवणारे शिग्रगृही मंत्री प्रथमच पाहीले.
अमेरिकेतून मास्टर ऑफ सायन्स (MS) पदव्युत्तर पदवी घेवूनही त्यांनी राजकारणात येण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागे त्यांचा दुरदुर्ष्टीपणा जाणवतो. शिक्षण, व्यवसाय, नोकरी अशा विविध क्षेत्रात अपयश आल्यामुळे अनेकजन राजकारणात येतात. मात्र राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी ठरवून समाजात काही विधायक काम करण्यासाठी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला, हे त्यांच्या कामावरुन अनेकवेळा जाणवते, अशा उच्च शिक्षीत लोकप्रतिनिधींची राजकारणात अत्यंत गरज आहे. मात्र राजकारणात आजही असे उच्च शिक्षीत लोकप्रतिनिधी बोटावर मोजण्याइतके दिसतात.
साधा गावचा सरपंच झाला तरी अंगावर बगळ्यासारखे पांढरे शुभ्र कपडे, त्यावर जॅकेट, पायात कोल्हापूरी चप्पल घालून रुबाबात मिरवत असतात, मात्र राज्यमंत्री असूनही साधा पांढरा शर्ट, काळी पॅंट, काळा बुट असे अत्यंत साधे राहणीमान, उच्च विचार आणि सर्वसामान्य जेनतेचे प्रश्न सोडण्याची तळमत पाहायला मिळते. राजकारणात असे फार क्वचिंत लोकप्रतिनीधी पाहायल मिळतात.
एकीकडे मंत्र्यांना भेटण्यासाठी जनतेला अनेकवेळा मुंबईच्या चक्रा कराव्या लागतात, तरी देखील मंत्री कार्यालयात भेटत नाहीत. त्यामुळे जनतेचा लोकप्रतिनिधींवर असलेला विश्वास कमी होत चालला आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री नागरिकांना भेटण्यासाठी जनता दरबार भरवतात, त्यामुळे राज्यांच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांना आपल्या हक्काच्या ठिकाणी मंत्री भेटतात. त्यांच्याशी बोलतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या सोडवण्यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न करतात. त्यामुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कृतीतून हे खरे ‘जनसेवक’ वाटतात.
राज्याचे युवा नेते, नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री आदरणीय प्राजक्तदादा तनपुरे साहेब आपणास वाढदिवसाच्या कोटी- कोटी शुभेछा..! उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा..!
- ® स्वप्नील भालेराव,
sbhalerao82@gmail.com
No comments:
Post a Comment