मोठ्या माणसाच्या संतानाला आपल्या आई-वडिलांच्या मोठेपणाचा फायदा सार्वजनिक क्षेत्रात मिळतो याबद्दल बऱ्याच वेळा टीकाटिप्पणी होते। भय्यासाहेबांनाही अशा टीकेचे भक्ष बनविण्याची खटपट झाली।
इतर देशातही अशी अनेक उदाहरणे आहेत। सर्वस्व पणाला लावणाऱ्या मोठ्या माणसांना सन्माननीय स्थान राहिलेले आहे। पण त्यांच्या वारसाकडून तशाप्रकारची अनाठायी अपेक्षा करणे गैर आहे।
● भगवान बुद्धाच्या मागे जाऊन, "तुझा वारसा मागून घे" असे माता यशोधरेने पुत्र राहुलला सुचविले। त्याबरहुकूम भगवंताकडे वारसा मागण्यास राहुल गेला असता, त्यावेळी भगवंतांनी उत्तर दिले की, "माझा धम्म हाच माझा वारसा, तो हवा असल्यास पुढे ये।" राहुलला पीत वस्त्रे धारण करून वडिलांचा वारसा चालविण्यास भिक्षु संघात जावे लागले।
● बाबासाहेबांना आपल्या पुत्राचे गुण माहीत होते की, "माझा मुलगा हा सोन्यासारखा आहे, तो कोणासमोरही हात पसरणार नाही।" बाबासाहेबांनी दिलेल्या ह्या सर्टिफिकेटची बरोबरी कोणती वस्तू वा वास्तू करू शकेल ?
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भय्यासाहेब यांच्यावर विश्वास टाकून त्यांना शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी पाठविले होते, त्यावेळेस मुकुंदराव त्यांचे सोबत होते। शीख धर्माचा अभ्यास झाल्यावर त्यांनी बाबासाहेबांना पूर्ण अहवाल सादर केला होता।
भय्यासाहेबांनी आपल्या कार्यकाळात अनेक आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत भाग घेऊन भारतीय बौद्धांचे, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, नेतृत्व केले होते।
● बाबासाहेबांनी यशवंतराव (भय्यासाहेब) यांचेकडे "जनता" वृत्तपत्राची जबाबदारी दिली होती, ती त्यांनी 1944 ते 1956 पर्यंत सांभाळली। "जनता" वृत्तपत्राचे नामकरण "प्रबुद्ध भारत" झाल्यावर त्याची संपूर्ण जबाबदारी 1956 ते 1968 पर्यंत सांभाळली। त्यांनी दोन्ही वृत्तपत्राच्या संपादक, व्यवस्थापक, मुद्रक इत्यादी जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळल्या।
भय्यासाहेबांचे साहित्य विपुल आहे। त्यांनी लिहिलेले संपादकीय लेख, त्यांची भाषणे, आमदार असतांना विधिमंडळात त्यांची गाजलेली भाषणे, त्यांच्यावर लिहिलेल्या कथा-कविता इत्यादी साहित्य खूप मोठ्या प्रमाणात आहेत। अजूनही काही ते पुढे यावयाचे आहे।
कामगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, बौद्धांच्या सवलती, स्त्रियांना न्याय हक्क मिळणे, राजकारण, धम्मकारण, समाजकारण इत्यादी कामात ते व्यस्त राहून अग्रेसर असतांना डॉ बाबासाहेब यांचा वारसा त्यांनी समर्थपणे जपला/ चालविलेला होता।
आज (17 सप्टेंबर 1977) त्यांचा स्मृतिदिन आहे। त्यांच्या स्मृती व कार्यास विनम्र अभिवादन !
= भीमराव तायडे, नांदुरा (जिल्हा: बुलडाणा)
9420452123
No comments:
Post a Comment