किनवट येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करा;अभिवक्ता संघाची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 16 September 2021

किनवट येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करा;अभिवक्ता संघाची मागणी

किनवट ,दि.१५ : येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयास मंजुरी मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, या आशयाचे निवेदन अभिवक्ता संघाच्या वतीने आमदार भीमराव केराम व खासदार हेमंत पाटील यांना नुकतेच देण्यात आले.

    निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, किनवट हा आदिवासी अतिदुर्गम, डोंगराळ व नक्षलप्रवण तालुका आहे.या तालुक्याचे जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर १५० कि.मी.इतके आहे.

   तालुक्यात किनवट,ईस्लापूर, मांडवी व सिंदखेड ही चार पोलिस ठाणे आहेत.तसेच पाच वनपरिक्षेत्र कार्यालये आहेत. याबरोबरच 'एफडीसीएम,'चे वन विभागीय प्रकल्प कार्यालय आहे.तालुक्याचे मुख्यालय असलेल्या किनवट शहरात निझाम काळापासून न्यायालय आहे.

    सध्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कामासाठी तालुक्यातील जनतेला नांदेड येथे जावे लागते.यामुळे नागरिकांचा भरपूर वेळ व पैसा खर्च होतो. तालुक्यातील जनतेची आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे.या सर्व पार्श्वभूमीवर किनलट येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय होणे गरजेचे आहे. 

  निवेदनावर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष एड.अरविंद चव्हाण,सचिव एड.पंकज गावंडे, सहसचिव एड.बी.पी.पवार,कोषाध्यक्ष एड.एस.एम.येरेकार,माजी उपाध्यक्ष  एड.एम.यु. सरपे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages