काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची मराठवाडा आढावा बैठक संपन्न ; डॉ. अरूणभाऊ शिरसाट यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 23 September 2021

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची मराठवाडा आढावा बैठक संपन्न ; डॉ. अरूणभाऊ शिरसाट यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव

औरंगाबाद: येथील गांधी भवन येथे जिल्हा काँग्रेस  कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने मराठवाडा स्तरीय बुथ कमिटी आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीला दिल्ली येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे समन्वयक व महाराष्ट्र प्रभारी मनोज बागडी, यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठी हे बहुजन समाजातील गरीब, दुर्लक्षित व अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत आग्रही भूमिका घेत असतात, त्यामुळे अनुसूचित जाती विभागाला राज्य शासनाच्या विविध मंडळात  समान संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, औरंगाबाद येथे काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे कार्य अत्यंत उल्लेखनीय, नोंद घेण्यासारखे व सर्वसमावेशक असे आहे, डॉ. अरुण शिरसाट यांनी अनुसूचित जाती विभागाचे असे मर्यादित राहून कार्य केले नाही तर, सर्व समाज घटकाला सोबत घेत त्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी आक्रमक भूमिका घेत कामगिरी केली आहे, असेही याप्रसंगी मनोज बागडी यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी विजय अंभोरे यांनी मनोगत व्यक्त केले, औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष हिशामजी उस्मानी यांनी अध्यक्षीय भाषण केले, यावेळी सोशल मीडिया प्रमुख प्रशांत पवार,  औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट, डॉ. पवन डोंगरे , डॉ.जितेंद्र देहाडे, प्रा.शिलवंत गोपणारायन,निलेश आंबेवाडीकर डॉ.मिलींद आठवले, किशोर सरोदे,  रवी लोखंडे, सचिन लोखंडे, विजय गायकवाड , शिरिष चव्हाण, उंटवाले संदीप बोरगे, महिला अध्यक्ष रेखाताई राऊत, प्रमोद धुळे, अमर हिवराळे, दिपक पाईकरव, सय्यद मिसबाह, गौतम खिल्लारे,रवी लोखंडे, सचिन लोखंडे, विजय चौधरी, विजय पट्टेकर, संचलन प्रा.अनिल पांडे,  आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. मा.मनोजजी बागडी यांनी आपले विचार मांडतांना ते म्हणाले की, बूथ बांधणी करतांना एकजुटीने उभे राहण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष डॉ अरुण शिरसाट यांनी केले कार्यक्रमाचे संचलन प्राध्यापक अनिल पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश आंबेवाडीकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages