औरंगाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ गीता पाटील ह्यांनी phd चा अंतिम शोधप्रबंध सादर करण्यासाठी बाह्य रेफरी च्या नावे हजारों रुपयांची मागणी केल्याचा घृणास्पद प्रकार केला आहे.
येमेन देशाचा विद्यार्थी मो.अब्दुलाह अल मसोदी (संशोधक विद्यार्थी) हा विद्यार्थी डॉ.गीता पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 5 वर्षांपासून संशोधन करत असून डॉ.पाटील ह्यांनी ह्या विद्यार्थ्याला अंतिम प्रबंध(फायनल सिनोप्सीस) सादर करण्यासाठी टाळाटाळ करून अपमानित करत बाह्य रेफरी ला पैसे दिल्याशिवाय तुझ्या कुठल्याही कागदपत्रांवर मी सह्या करणार नाही असे फर्मान सोडले आहे सदरचा प्रकार हा विद्यापीठाच्या संशोधन प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे.
यापूर्वी खोट्या अनुभव प्रमाणपत्राआधारे विद्यापीठात नोकरी मिळवणे , संशोधक विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी करणे , पदाचा गैरवापर करत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशापासून रोखणे , परदेशी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे हेतूने प्रमाणपत्रामध्ये खाडाखोड करणे, विद्यार्थ्यांचे मोबाईल हिसकावून घेणे,कर्मचाऱ्यांवर छेडछाडीचे खोटे आरोप करणे,संशोधक विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जाणे असे अशोभनीय प्रकार केल्याने ह्या पूर्वी त्यांची विद्यापीठाने २०१७ गाईडशीप व हेडशीप रद्द करण्यात आली होती. तरीही त्यांच्याकडे संशोधन करनारे संशोधक कसे ?
त्या विभाग प्रमुख असल्यामूळे प्रीव्हाय वा ववीएचडी च्या मौखीक परीक्षेच्या अध्यक्ष असल्याने त्या विद्यार्थ्यांना सतत छळत आहेत.
त्यांना तात्काळ विभागप्रमुख पदावरून व ईतर सर्व समितीवरून हटवावे त्यांची सखोल चौकशी करून बडतर्फ करावे त्याचप्रमाणे काही मागण्या करण्यात आल्या आहेत .
डॉ.गीता पाटील ह्यांच्याकडे संशोधन करणाऱ्या M. phil, Ph.D च्या विद्यार्थ्यांना इतर मार्गदर्शकाकडे वर्ग करा.
आंतरराष्ट्रीय स्थरावर विद्यापीठाची बदनामी करूनही विद्यापीठ प्रशासन कारवाई करत नसल्याने संघटनांनी नाराजी व्यक्त केली.
डॉ.गीता पाटील ह्यांची गाईडशीप रद्द करूनही त्यांच्या कडे संशोधक विद्यार्थी कसे ?
गाईड नसताना त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएचडी च्या मौखिक परीक्षा ह्या वैध आहेत का ?
गीता पाटील ह्या गाईड आहेत की नाही ? ह्याचा खुलासा करण्याची मागणी तसेच या प्रकरणी कुलगुरूंनी प्र.कुलगुरू डॉ.शाम शिरसाठ यांना जाब विचारला.
यावेळी स्वाभिमानी मूप्टा चे डॉ.शंकर अंभोरे,रिपाई चे नागराज गायकवाड,डाटा संघटनेचे डॉ.किशोर वाघ,रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम,काँग्रेसचे डॉ.अरुण शिरसाठ, एमआयएम चे डॉ.कुणाल खरात,पँथर्स चे गुणरत्न सोनवणे, एसेफाय चे लोकेश कांबळे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अतुल कांबळे, सत्यशोधक चे अमोल खरात,दीक्षा पवार,डॉ.राहुल तायडे,अश्विन जोगदंड,संदीप वाहुळ,विजय वाहुळ,डॉ.भगवान गव्हाडे,संघर्ष साबळे,राजेश नावकर,जयश्री शिरके यांच्या सह विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment