नांदेड दि. 24 :- नेहरु युवा केंद्र संगठन युवा कार्य व खेळ मंत्रालय भारत सरकारच्यावतीने जन आंदोलनात सर्वाचा सहभाग या थिमप्रमाणे देशभरात 744 जिल्ह्यात व जिल्ह्यातील 75 गावामध्ये 13 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत फिट इंडिया रनचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात शनिवार 25 सप्टेंबर रोजी जवळपास 100 युवक-युवती सहभागी होवून दौड होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यामध्ये सर्व विभागाचे विभागप्रमुख, विविध क्रीडा संगठना, युवक मंडळ, प्रतिनिधी व स्वयंसेवक यांचा सहभाग राहील. या रॅलीची सुरुवात सकाळी 7 वाजता आयटीआय पासून अण्णाभाऊ साठे चौक मार्गे स्टेडियम येथे होणार आहे. या रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा व भारताच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment