इंग्रजी विभागप्रमुख डॉ.गीता पाटील ह्यांच्या कडून Ph.d च्या थेसिस वर सह्यांसाठी पुन्हा पैशांची मागणी ; परदेशी विद्यार्थ्यांची कुलगुरू व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडे तक्रार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 21 September 2021

इंग्रजी विभागप्रमुख डॉ.गीता पाटील ह्यांच्या कडून Ph.d च्या थेसिस वर सह्यांसाठी पुन्हा पैशांची मागणी ; परदेशी विद्यार्थ्यांची कुलगुरू व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडे तक्रार

 

औरंगाबाद : पी. एचडी थेसिस वर सह्या करण्यासाठी पैशांची मागणी केल्या प्रकरणी गाईडशीप गमावणाऱ्या विद्यापीठाच्या इंग्रजी विभागप्रमुख डॉ.गीता पाटील कडून पुन्हा एकदा पैशांची मागणी केल्याप्रकरणी येमेनी विद्यार्थी मो.अब्दुल्ला अलमसुदी ह्याने कुलगुरू व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडे सदरील विषयी लेखी तक्रार केली आहे.


ह्या पूर्वी देखील मागासवर्गीय विद्यार्थ्याला प्रवेश नाकारणे,परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर खाडाखोड करणे,संशोधक विद्यार्थ्याला पैशांची मागणी करणे असे प्रकार समोर आल्याने रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या आंदोलनवरून त्यांची गाईडशीप रद्द करून त्यांची विभागप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.


गीता पाटील ह्याची गाईडशीप रद्द केल्यानंतरही त्या Ph.Dआणि MPhil च्या मौखिक परीक्षा समिती RRC च्या चेअरमन आहेत ह्याचा गैरफायदा घेत संशोधक विद्यार्थ्यांचा छळ करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे.


सदरील तक्रारीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा विद्यापीठाच्या संशोधन प्रक्रिया वादात सापडली आहे डॉ.गीता पाटील प्रमाणेच डॉ.भारत हंडीबाग, डॉ.रेणुका बडवणे ह्यांच्यावर गाईडशीप रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली होती.


सदरील येमेनी विद्यार्थ्याला गेल्या एक ते दीड वर्षापासून  फायनल सिनॉप्सिस सबमिट करण्यासाठी दरवेळेस  चुकीची वागणूक दिल्या जात आहे .मागील सहा महिन्यांपासून त्याला पैशाची मागणी होत आहे.शेवटी त्याला स्पष्टपणे सांगण्यात आले की बाहेरच्या रेफरीला पैसे दिल्याशिवाय तुझे रिपोर्ट्स येणार नाहीत.त्याशिवाय मी तुला मदत करणार नाही.याच विद्यार्थ्यांने एक दोन महिन्यांपूर्वी  फॉरेन अॅम्बेसि सुद्धा तक्रार केलेली आहे. त्यांनी याची दखल घेऊन कुलगुरूंना पत्रव्यवहार केलेला आहे .

परदेशी विद्यार्थ्यांची पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून अश्या तऱ्हेने लूट केल्याने विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय स्थरावर बदनामी होते परंतु राजकीय दबावामुळे गीता पाटील सारख्या प्रवृत्ती सोकवल्या आहेत.


गीता पाटील ह्यांना विभागप्रमुख पदावरून तात्काळ हटवावे,Ph.Dआणि MPhil च्या मौखिक परीक्षा समिती RRC च्या चेअरमन पदावरून हटविण्यात यावे ह्यासाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यातकरण्याचा  सचिन निकम,अतुल कांबळे ह्यांनी इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment

Pages