रेल्वे प्लेटफार्म वरील पाकिटमार,दारुडे व गंजेटि यांचा वावर थांबवावा -प्रवाशांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 12 September 2021

रेल्वे प्लेटफार्म वरील पाकिटमार,दारुडे व गंजेटि यांचा वावर थांबवावा -प्रवाशांची मागणी

किनवट,दि.१२ : शहरातील रेल्वे स्थानकावरील दोनही प्लेटफार्म हे सध्या दारुडे,गंजेटी व मटका बहादरांचे आश्रय स्थान झाल्याचे दिसत आहे.याकडे रेल्वे पोलिसांचेही दुर्लक्ष झाल्याचे जाणवत आहे.

   किनवट रेल्वे स्थानकावर दोन प्लेटफार्म आहेत.नांदेड -आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस सायंकाळी ६ च्या सुमारास किनवट रेल्वे स्थानकात येते.ही रेल्वे येण्याच्या अर्धा तास आधि रेल्वे परिसराच्या आसपास असणाऱ्या गल्लीतून तीन पाकीटमार युवक न चुकता रेल्वे स्थानकावर हजर होतात व रेल्वे आल्यानंतर उतरण्याच्या व चडण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांचा खिसा साफ करून ते रेल्वे गेल्यानंतर तिथेच ठाण मांडून बसतात.मग त्यांचा तेथे गांज्याची हुक्का पार्टि व दारु ढोसण्याचा कार्यक्रम रात्री जवळपास ९ ते१०  पर्यंत चालतो.दारुच्या नशेत मग ते कधी - कधी "पाकिस्तान जिंदाबाद", व "हिंदुस्ताश मुर्दाबाद," अशा घोषणाही देतात.हा सर्व प्रकार प्लेटफार्म क्रमांक एकवर आदिलाबाद दिशेला असणा-या रेल्वे स्थानकाच्या नावाच्या पाटिखाली राजरोसपणे चालु आहे. रेल्वे स्थानकावर संशयास्पद वावरणाऱ्या तीन युवकांनकडून गांज्याची विक्री ही त्यांच्या नेहमीच्या ग्राहकांना करण्यात येते. 

  तसेच प्लेटफार्म क्रमांक दोनवर ही मटका खेळणारे व दारु पिणारे जागोजागी बसल्याचे आढळून येते.या गैर कायद्याच्या मंडळीकडून एखादे वेळेस मोठी अप्रिय घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.यापूर्वी याच प्लेटफार्म वर एका वकिलाला जब्बर मारहाण करून लुटल्याची घटना काही महिण्यांपुर्वि घडली होती. रेल्वे प्लेटफार्म वर सर्रास होणारा हा गैरप्रकार रेल्वे पोलिसांनी त्वरीत रोखावा,अशी अपेक्षा प्रवासी जनतेतून व्यक्त करण्यात  येत आहे.

No comments:

Post a Comment

Pages