पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता ह्यांच्या पुढाकाराने उद्योजक व आंबेडकरी कार्यकर्त्यांत संवाद; पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 10 September 2021

पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता ह्यांच्या पुढाकाराने उद्योजक व आंबेडकरी कार्यकर्त्यांत संवाद; पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग

औरंगाबाद : 

 भोगले ऑटोमोटिव्ह येथील प्रकरणानंतर आंबेडकरी समूहाला जाणीवपुर्वक लक्ष करून बदनामी करण्याच्या प्रकारावरून आंबेडकरी समूहातील वाढता असंतोष लक्षात घेऊन आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीच्या सततच्या पाठपुराव्याने  पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता ह्यांनी पुढाकार घेत पालकमंत्री सुभाष देसाई ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेडकरी कार्यकर्ते व उद्योजकांची संयुक्त समन्वय बैठक पार पडली ह्या बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पालकमंत्री सुभाष देसाई हे उपस्थित होते.


बैठकीत समितीचे निमंत्रक श्रावनदादा गायकवाड ह्यांनी आंबेडकरी समूहाला बदनाम करण्याचे षड्यंत्र हणून पाडण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेतला ह्याचे सर्वांच्या वतीने कौतुक केले राम भोगले सारखे काही उद्योजक हे कुणाच्या इशाऱ्यावरून आंबेडकरी समूहाला (कामगारांना) बदनाम करत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला आंबेडकरी समूह कुठल्याही उद्योजकांच्या विरोधात नसून ज्या प्रवृत्ती उद्योजकांना पुढे करून द्वेष पसरवून सामाजिक समतोल खराब करत असतील त्याचा प्रतिकार करत आहे.

भोगले ऑटोमोटिव्ह च्या प्रकरणात पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली त्यातील गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसणाऱ्यांची नावे काढून घ्यावीत,सचिन गायकवाड ह्याला सन्मानाने नौकरीवर परत घ्यावे,सचिन गायकवाड वरील गुन्हा मागे घेण्यात यावा,राम भोगले व इतर उद्योज ह्यांनी आंबेडकरी समुदायाची माफी मागावी अश्या आग्रही मागण्या पालकमंत्री देसाई ह्यांच्या कडे ठेवल्या आंबेडकरी समुदायाच्या न्याय हक्काची पायमल्ली करून चळवळ दडपण्याचा प्रयत्न होईल तर आम्ही रस्त्यावर उतरुच असा इशाराही दिला.

ह्यावेळी मिलिंद दाभाडे,कृष्णा बनकर ह्यांनी उद्योजकांनी आंबेडकरी समुदायाला लक्ष करणाऱ्यांच्या मागे उभे राहू नये,कामगारांशी समन्वय ठेऊन उद्योग क्षेत्रात औरंगाबाद शहराचा लौकिक वाढवावा असे आवाहन केले.

प्रा.सिद्धोधन मोरे,सचिन गायकवाड,सचिन शिंगाडे ह्यांनी घडल्या प्रकारची सत्यता सांगितली तर आनंद कस्तुरे,प्राणतोष वाघमारे,दीपक निकाळजे ह्यांनी पोलिसांनी एक तर्फी कारवाई करत भेदभाव केला असल्याकडे लक्ष वेधले.

उद्योजकांच्या वतीने मानसिंग पवार ह्यांनी भूमिका मांडताना इथून पुढे असे प्रश्न उदभवणार नाहीत ह्याची काळजी घेऊ,आंबेडकरी समूहाने सहकार्य करावे,कामगार हा आमचा सहकारी आहे,कुठल्याच कामगाराला दुय्यम वागणूक मिळणार नाही ह्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देत घडल्या प्रकारातील सत्य जाणून घेतली.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना उद्योगमंत्री देसाई ह्यांनी उद्योगक्षेत्रात उद्योजक व कामगार हे दोन्ही महत्वाचे घटक आहेत,कामगारांना आकसबुद्धीने वागणूक देऊन उद्योग वाढू शकत नाही उद्योग आणि कामगार हे परस्परपूरक असल्यास उद्योगाला चालना मिळते,औरंगाबाद औद्योगिक नगरी हे महाराष्ट्राचे महत्वाचे केंद्र आहे उद्योजक व कामगारांमध्ये समन्वय रहावा ह्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.  या अनुषंगाने अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे.

वरील मागण्यांच्या अनुषंगाने बोलताना पोलीस आयुक्त श्री.गुप्ता ह्यांनी औद्योगिक क्षेत्रात कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलिसांसोबतच उद्योजक व नागरिकांचे कर्तव्य आहे कामगारांना असा त्रास होत असेल तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा,पोलीस प्रशासनाला कामगार व उद्योजक हे समान आहेत,कुणावरही अन्याय होणार नाही असे स्पष्ट केले. आयुक्त डॉ.निखिल गुप्ता ह्यांनी पुढाकार घेऊन समोचाराने मार्ग काढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, स.पोलीस आयुक्त विवेक सराफ,विशेष शाखेचे स.पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे तसेच अ‍ॅड.धनंजय बोरडे,सचिन निकम,उत्तमराव गायकवाड,विनोद साबळे,अ‍ॅड.अतुल कांबळे, गुणरत्न सोनवणे ह्यांची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

Pages