पत्रकार भवन प्रश्नी फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 17 November 2021

पत्रकार भवन प्रश्नी फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

नांदेड: 

नांदेड येथे पत्रकार भवन बांधण्याच्या प्रश्नावर पत्रकारांची फसवणूक करणाऱ्या पत्रकार संघटना व त्यांचा पदाधिकाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जेष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना दिले.

गेल्या 35 वर्षांपासून पत्रकार भवन उभारण्याचा प्रश्न कांही पत्रकार संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे प्रलंबित आहे.राज्यातील चार मुख्यमंत्र्यांनी लाखो रुपयांचा निधी दिला असूनही पत्रकार भवन बांधण्यात आलेले नाही.संबंधित पत्रकार संघटना व त्यांचे पदाधिकारी मूग गिळून गप्प आहेत.ते न निधीचा हिशोब देतात न जागेबदल काही बोलतात

गेल्या 10 वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार पत्रकार संघटना मध्ये समेट घडवून आणण्यात आला.व  पत्र प्रबोधिनी नावाची विश्वस्त संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेस अशोकराव चव्हाण यांनी कांही निधी दिला व सिडको येथील मुख्य रस्त्यावरील दहा हजार चौरस फुटाचा प्लॉट उपलब्ध करून दिला.10 वर्ष उलटूनही पत्रकार भवन अद्याप बांधण्यात आलेले नाही.आता या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. असे असूनही पत्र प्रबोधिनीचे विश्वस्त कांहीही सांगण्यास तयार नाहीत.या प्रकरणी अशा प्रकारे पत्रकारांची फसवणूक झाली आहे.ही फसवणूक करणाऱ्या पत्रकारांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.


 या  निवेदनावर  जेष्ठ पत्रकार  अनिकेत कुलकर्णी यांच्यासह.  राजकुमार कोटलवार, धनंजय सोळंखे , महेंद्र गायकवाड ,शशिकांत गाढे, अमरदीप गोधने,रविंद जोंधळे,शेख मौला, महमद मुबिन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages