बुलडाणा- येथील जळगांव जामोद तालुक्यातील कुरणगाड बु, गावचे भूमिपुत्र दिवंगत प्रा. पांडुरंग आठवले यांच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर 2021 सोमवार रोजी गावातील जेष्ठ नागरिकांना थंडीच्या दिवसात आधार वाटावा म्हणून ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले,याप्रसंगी शहादेव आठवले,गौकर्णा आठवले, प्राजक्ता आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आशाताई उमाळे हे होत्या, प्रा. पांडुरंग आठवले यांनी कायम परिवारापेक्षा समाज व सामाजिक कार्याला प्राधान्य दिले, शालेय शिक्षणात प्रा. पांडुरंग आठवले अत्यंत हुशार व गुणवत्तापूर्ण असा होता, इंग्रजी भाषा व विषयाची त्याला फार आवड होती, म्हणूनच त्याने इंग्रजी विषयात करियर करून संशोधन केले, प्रा. पांडुरंग आठवले हा खूप मनमिळाऊ व स्नेह जपणारा होता,त्याने पारिवारिक नातेसंबंध कसे टिकवून ठेवावेत याबाबद्दल एक आदर्श निर्माण केला होता, त्याचा आदर्श घेऊन आजच्या पिढीने मार्गक्रमण करावे असा विश्वास आशाताई उमाळे यांनी व्यक्त केली.
डॉ. मिलिंद आठवले यांनी प्रा. पांडुरंग आठवले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौद्धचार्य देवानंद आठवले यांनी केले, सूत्रसंचालन गायक किशोर भारसाकडे यांनी केले तर आभार कपिल आठवले यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश भारसाकडे, पप्पू आठवले, प्रमित आठवले, शौर्य आठवले यांनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment